सेंट्रल जेलमध्ये ड्यूटीवर तैनात असणाऱ्या महिला पोलिसाला जेलर वॉशरुममध्ये घेऊन गेला, अन् तिथे..

सेंट्रल जेलमध्ये महिला कर्मचाऱ्यासोबत नको ते कृत्य केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. जेलरवरच आरोप आहे. त्या दिवशी रात्री 10.30 वाजता महिला शिपाई जेल परिसरात ड्यूटीवर होती. तिथे फेऱ्या मारत असताना तिची प्रशासनिक जेलर मग्रू सिंह मरावीसोबत भेट झाली.

सेंट्रल जेलमध्ये ड्यूटीवर तैनात असणाऱ्या महिला पोलिसाला जेलर वॉशरुममध्ये घेऊन गेला, अन् तिथे..
Jailer
| Updated on: Nov 28, 2026 | 9:09 PM

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये महिला कर्मचाऱ्यासोबत नको ते कृत्य केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 58 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने जेलर मग्नू सिंह मरावीवर ड्यूटीच्यावेळी नको ते कृत्य केल्याचा आरोप केला आहे. जेलर ड्युटीवर तैनात असताना महिला कर्मचाऱ्याला वॉशरुममध्ये घेऊन गेला. तिथे त्याने नको ते कृत्य केलं. वर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. महिला कर्मचाऱ्याने हा आरोप केला आहे. तक्रारीनंतर गांधी नगर पोलिसांनी आरोपी जेलर विरोधात विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी रात्री 10.30 वाजता महिला शिपाई जेल परिसरात ड्यूटीवर होती. तिथे फेऱ्या मारत असताना तिची प्रशासनिक जेलर मग्रू सिंह मरावीसोबत भेट झाली. जेलर आधी माझ्याशी अश्लील बोलला. मग जबरदस्तीने वॉशरुममध्ये नेऊन त्याने नको ते कृत्य केलं असा महिला कर्मचाऱ्याचा आरोप आहे.

या बद्दल कुठे वाच्यता केलीस, तर जीवानिशी संपवण्याची आरोपीने धमकी दिली असं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकाराने घाबरलेली महिला रात्री उशिरा गांधी नगरला आली. तिने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तिची मेडिकल चाचणी केली. तपास पथकाने सेंट्रल जेलमध्ये जाऊन कथित घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली.

Loading...

उलटे महिला पोलिसावरच आरोप काय?

हे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय जेल प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशासनाने महिला पोलीस शिपायाने याआधी पूर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारीचे दाखले दिले. तिच्याच सेवा आचरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. जेल प्रशासनानुसार, महिलेच्या सर्विस बुकमध्ये वर्ष 2003 पासूनच प्रतिकूल टिप्पण्यांची नोंद आहे. वर्ष 2004 मध्ये सुद्धा महिला शिपायाने तत्कालीन जेल अधीक्षकावर आरोप केले होते. त्यानंतर 2018 साली तीन कर्मचाऱ्यांविरोधात छेडाछाडीची तक्रार दाखल केली.

जेल प्रशासनानुसार वर्ष 2026 मध्ये जेलच्या मेनगेट कीपरने महिला शिपायाविरुद्ध शिवीगाळ केल्याचा आणि खोटे आरोप केल्याविषयी तक्रार अर्ज दिला होता. ही जुनी प्रकरणं आणि सेवा आचरणाशी संबंधित कागदपत्र सुद्धा पोलीस तपासात पाहिली जाऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us