मोठी बातमी! भाजपने गेम फिरवला, बिहारमध्ये मित्र पक्षाला सर्वात मोठा धक्का, नवनिर्वाचित शिक्षक मतदारसंघातील आमदाराचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्रात पाच विधान परिषद जागांसाठी निवडणूक झाली, ज्यामध्ये तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला तर दोन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! भाजपने गेम फिरवला, बिहारमध्ये मित्र पक्षाला सर्वात मोठा धक्का, नवनिर्वाचित शिक्षक मतदारसंघातील आमदाराचा भाजपात प्रवेश
bjp
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 3:46 PM

नुकत्याच महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या चार प्रमुख राज्यांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात पाच जांगावर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. ज्यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा झटका बसल्याचं पहायला मिळालं. पाच पैकी 2 जागा या महायुतीला मिळाल्या तर तीन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ अशा तीनही पदवीधर मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बिहार विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले बंशीधर ब्रजवासी आणि राहुल राज यांनी आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपाचं संख्याबळ वाढलं असून, विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशावर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Loading...

राष्ट्रीय जनता दल आरजेडीने यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारचा पक्ष प्रवेश हा असंवैधानिक असल्याचं आरजेडीचे प्रवक्ता शक्ति सिंह यादव यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे ज्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, त्या दोन्ही आमदारांनी आपआपल्या मतदारसंघामध्ये भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या जेडीयूच्या उमेदवाराचा परभाव केला आहे. राहुल राज यांनी सारण शिक्षक मतदारसंघामधून जेडीयूचे उमेदवार आनंद पुष्कर यांचा पराभव केला, तर दुसरीकडे बंशीधर ब्रजवासी यांनी तिरहुत पदवीधर मतदारसंघामधून जेडीयूचे उमेदवार अभिषेक झा यांचा पराभव केला. यामुळे आता भाजपाचं संख्याबळ वाढलं आहे. हा भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या जेडीयूसाठी देखील मोठा धक्का आहे.  चार राज्यांमधील 28 जागांसाठी ही निवडणूक झाली होतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश होता.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us