AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफनंतर अमेरिकेला मोठा धक्का, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून या बलाढ्य देशानं केली मोठी घोषणा, भारताला लागला डबल जॅकपॉट

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

टॅरिफनंतर अमेरिकेला मोठा धक्का, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून या बलाढ्य देशानं केली मोठी घोषणा, भारताला लागला डबल जॅकपॉट
| Updated on: Aug 22, 2025 | 1:07 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, सुरुवातीला त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीन आणि रशिया यांची भारतासोबत जवळीक वाढत आहे, यामुळे अमेरिकेच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे. तसेच जे देश रशियाकडून तेल खरेदी करतात, त्यांच्यावर देखील टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे, दरम्यान अमेरिकेनं टॅरिफ लावण्यानंतर आता रशिया भारतासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे, रशियानं भारताचं समर्थन करतानाच अमेरिकेला सुनावलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार रशियन दूतावासाकडून अमेरिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, जर भारतीय सामान अमेरिकेमध्ये जाणार नसेल तर ते आपलं सामान रशियामध्ये पाठवू शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करू, अमेरिकेनं भारतावर जो टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, तो अतिशय चुकीचा आहे, अमेरिका भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं रशियाच्या दूतावासानं म्हटलं आहे.

दरम्यान रशियाच्या दूतावासानं असं देखील म्हटलं आहे की, भारताला रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे, त्यामध्ये भारताचा फायदाच फायदा आहे. त्यामुळे भविष्यातही भारत तेल खरेदीचा आपला निर्णय बदलेल असं आम्हाला वाटत नसल्याचं रशियाच्या दूतावासानं म्हटलं आहे.

दुसरीकडे भारताला चीनचा देखील पाठिंबा मिळत आहे, चीनच्या दूतावासानं देखील भारताला समर्थन दिलं आहे. भारत आणि चीन जर एकत्र आले तर व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. भातीय वस्तुंच आम्ही आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं चीनने म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिकन बाजारपेठेच्या बदल्यात भारतासाठी या दोन्ही मोठ्या देशांच्या बाजारपेठा ओपन होण्याची शक्यता आहे, टॅरिफनंतर भारत, चीन आणि रशियाची वाढत असलेली जवळीक हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?