मोठी बातमी! भाजपला काँग्रेसचा सर्वात मोठा धक्का; जिव्हारी लागणारा पराभव, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाही सुटला नाही

भाजपला काँग्रेसने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या तडाख्यामधून मुख्यमंत्र्यांचा जिल्हा देखील सुटू शकला नाही, तिथेही काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे.

मोठी बातमी! भाजपला काँग्रेसचा सर्वात मोठा धक्का; जिव्हारी लागणारा पराभव, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाही सुटला नाही
काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 9:39 PM

राजस्थानमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. बुधवारी 37 जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आला. 37 पैकी 24 जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. तर भाजपाच्या वाट्याला अवघ्या सात जिल्हा परिषद आल्या आहेत. तर दोन जिल्हा परिषदांमध्ये भारत आदिवासी पार्टीचा अध्यक्ष निवडून आला आहे. तर एक जिल्हा परिषद राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या वाट्याला आली आहे. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे, मात्र असं असताना देखील या निवडणुकीमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. इथे भाजपचे भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री आहेत. मात्र या तडाख्यातून भजनलाल शर्मा यांचा जिल्हा देखील सुटला नाहीये. भरतपूरमधून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेणु बाला या विजयी झाल्या आहेत. भजनलाल शर्मा यांच्या जिल्ह्यामध्ये भाजप उमेदवाराला 14 तर काँग्रेसला 17 मतं पडली. काँग्रेसच्या उमेदवार रेणू बाला या विजयी झाल्या आहेत.

भाजपचा कुठे कुठे विजय?

Loading...

झालवाडमधून भाजपच्या वर्षा झाला यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. बालोतरामधून भाजपच्या सुशीला भील या विजयी झाल्या आहेत. चुरूमधून कनिका सिंह राठोड, प्रतापगढमधून हरकरी मीणा तर अजमेरमधून पूजा भंसाली यांचा विजय झाला आहे. तर 37 पैकी तब्बल 24 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे.

अशोक गहलोत यांची प्रतिक्रिया

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असून देखील काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. या विजयावर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा लोकांमध्ये सत्तेविरोधातील एक प्रकारचा रोष दिसून येत आहे, असं गहलोत यांनी म्हटलं आहे. तसेच अजूनही भाजप आपला पराभव स्विकारण्यास तयार नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दरम्यान आता 26 नोव्हेंबरला जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us