
विचार करा जर आकाशातून प्रचंड वेगानं एखादा महाकाय दगड पृथ्वीच्या दिशेनं येत असेल तर काय होईल? जर हा दगड पृथ्वीला धडकला तर हजारो अणूबॉम्बने देखील जेवढं नुकसान होणार नाही तेवढं पृथ्वीच नुकसान या दुर्घटनेमुळे घडू शकतं. ही काही सायंस फिक्शन चित्रपटाची कथा नाहीये, तर याबाबत नासाकडून देखील इशारा देण्यात आला आहे. 24 मे 2025 रोजी एक विशाल अॅस्ट्रोइड , ज्याचं नाव 2003 MH4 आहे, तो पृथ्वीच्या एकदम जवळून जाणार आहे. यामुळे पृथ्वीचं तसं थेट नुकसान होण्याची शक्यता नाही.
मात्र या घटनेमुळे वैज्ञानिक देखील चांगलेच धास्तावले आहेत, वैज्ञानिक या घटनेकडे गांभीर्यानं पाहात आहेत. या अॅस्ट्रोइडचं क्षेत्रफळ अंदाजे 335 मीटर एवढं आहे, म्हणजे त्याचं आकारमान तब्बल तीन फुटबॉल मैदानाएवढं आहे. या अॅस्ट्रोइडचा वेग प्रति सेंकद 14 किलोमीटर एवढा प्रचंड आहे. हा अॅस्ट्रोइड अपोलो ग्रुपचा एक भाग आहे. सामान्यपणे अपोलो हा एक दगडांचा समूह आहे, जो पृथ्वीच्या कक्षेला क्रॉस करतो.
पृथ्वीच्या किती जवळ येणार?
लघुग्रह 2003 MH4 हा पृथ्वीपासून 6.68 मिलियन किलोमीटर अंतरावरून जाणार आहे, ऐकण्यासाठी हे अंतर फार जास्त वाटतं. मात्र खगोलशास्त्राच्या भाषेत हे अतंर खूप जवळ मानलं जातं. हे अतंर पृथ्वी आणि चंद्रापेक्षा फक्त 17 पट अधिक आहे. याबाबत नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) ने सांगितलं सध्या तरी या अॅस्ट्रोइडचा पृथ्वीला फार धोका नाहीये, मात्र जर या अॅस्ट्रोइडच्या गतीमध्ये किंवा दिशेमध्ये काही बदल झाल्यास ही घटना पृथ्वीसाठी धोकेदायक ठरू शकते.
याबाबत माहिती देताना शास्त्रांनी सांगितलं की, जर एवढा मोठा अॅस्ट्रोइड पृथ्वीला धडकला तर हजार अणू बॉम्ब एवढी ऊर्जा एकाच वेळेस उत्सर्जित करू शकतो. त्यामुळे पृथ्वीचं प्रचंड मोठं नुकसान होईल. हा अॅस्ट्रोइड पृथ्वीला धडकला तर एकाचवेळी प्रचंड प्रमाणात उष्णता, त्सुनामी आणि भूकंप अशी संकटं येतील. यामुळे सुर्याचा प्रकाश देखील अडवला जाऊ शकतो. मात्र सध्या तरी हा लघु ग्रह पृथ्वीला धडकण्याची कोणतीही शक्यता वाटत नसल्याचंही नासाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या लघु ग्रहावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचंही नासाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.