मोठी बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ, CJP च्या आंदोलनाला मोठं यश
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली, नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जतंर मंतरवर सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे.
सीजेपी आंदोलकांच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं, दरम्यान नीट परीक्षा पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण मंत्रालयाकडून (NTA) राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सीमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे, याची सुरुवात झाली असून, समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे, अजूनही काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. हे सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.
सीजेपी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यावर ठाम
दरम्यान दुसरीकडे सीजेपी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोडून आम्हाला इतर काहीही मंजूर नसल्याचं सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल अशी भूमिका दिपके यांनी जाहीर केली आहे.