
दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट झाला आहे, या स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की, ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारचा फक्त सांगाडाच उरला आहे, तर या कारच्या शेजारी ज्या दोन ते तीन कार पार्क केल्या होत्या त्या देखील जळून खाक झाल्या आहेत. तर इतर सात ते आठ कारच प्रचंड नुकसान झालं आहे. या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला आहे. हा स्फोट प्रचंड तीव्रतेचा होता. एकदाच मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर काही ठिकाणी तडे गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत, जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बॅटरीचा स्फोट की घातपात?
दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारचा फक्त सांगाडाच उरला आहे. या स्फोटाचं नेमकं कारण काय बॅटरीचा स्फोट की काही घातपात याचा शोध आता आता पोलिसांकडून घेतला जात आहे, जोपर्यंत पोलिसांचा प्राथमिक तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंदाज या स्फोटाबाबत वर्तवता येणार नाहीये.
सुरक्षा वाढवली
दरम्यान या घटनेनंतर आता फक्त दिल्लीच नाही तर मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे, दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी या स्फोटासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली आहे, अमित शाह यांनी या स्फोटाबाबत माहिती घेतल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या स्फोटाची माहिती घेतली आहे.