मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी संन्यास, राजकारणात मोठी खळबळ
आजचं राजकारण हे भ्रष्ट झालं आहे. आता निवडून यायचं असेल तर लोकांना पैसे द्यावे लागतात, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती असं म्हणत काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी निवडणुकीच्या राजकारणातून सन्यास घेतला आहे. या संदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रविवारी त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे देखील ते चांगलेच व्यथित झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज राजकारण हे पूर्णपणे भ्रष्ट झालं आहे. त्यामुळे मी आता मोठा निर्णय घेतला आहे, मी 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये, मी राजकारणात सक्रिय राहील परंतु ते फक्त जनतेसाठी लोकांची काम करण्यासाठी अशी पोस्ट सिद्धारमैया यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, वरुण विधानसभा मतदारसंघातील लोकांची अशी इच्छा आहे की मी पुन्हा एकदा निवडणूक लढावी, तसा या मतदारसंघातील लोक मला आग्रह करत आहेत, परंतु मी आता ठरवलं आहे की, मी भविष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाहीये. पहिल्या काळात जेव्हा मी निवडणूक लढवायचो तेव्हा लोकं माझ्यासाठी मदत म्हणून पैसे गोळा करायचे आणि मला निवडणुकीत विजयी करायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता माझं वय 79 वर्ष आहे, अजून राज्यातील आमच्या सरकारचा दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. तेव्हा माझं वय 82 वर्ष असेल, आता मला माझं आरोग्य पूर्वी सारखी साथ देत नाहीये, त्यामुळे संपूर्ण ऊर्जेनं जनतेसाठी काम करणं शक्य होत नाही, त्यामुळेच आपण आता यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत, असं सिद्धारमैया यांनी जाहीर केलं आहे.
आज राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झालं आहे, निवडून येण्यासाठी नेत्यांना लोकांना पैसे द्यावे लागत आहेत. इमानदार लोकांना आताच्या राजकारणात कोणतंही स्थान उरलेलं नाहीये. गेल्या पाच दशकांपासून कर्नाटकची जनता माझ्यासोबत आहे, जनतेनं मला प्रचंड प्रेम दिलं. परंतु सध्याची परिस्थिती पहाता आता इथून पुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे, असं सिद्धारमैया यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता अवघ्या दीड वर्षांवर कर्नाटक विधानसभेची निवडणूक आली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच सिद्धरमय्या यांनी ही घोषणा केल्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.