ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांच्या शिवसेना शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून परवानगी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, आधी तब्बल 58 आमदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर वीस खासदार पक्षातून बाहेर पडले. या सर्व खासदारांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला स्वंतत्र गट म्हणून अजून लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र आज अखेर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी मोठा निर्णय दिला आहे. या सर्व वीस खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे, तसेच अधिवेशन काळात या खासदारांची वेगळी सिटिंग व्यवस्था करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे महिनाभरापूर्वी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली होती, या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवेसना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या शिवसेना शिंदे गटातील विलिनीकरणाला देखील लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे, तर शिवेसना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार राहिले आहेत. वीस तारखेपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, या अधिवेशनापूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट
पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला काँग्रेसचा मोठा पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, आधी आमदार आणि नंतर खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. आता या खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.