सर्वात मोठी बातमी, युद्धापूर्वीच पाकिस्तानमध्ये मोठी फूट, एक अख्ख राज्य भारताच्या बाजुनं?

भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे, सीमेवर वारंवार पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रासंधीचं उल्लंघन होत आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी, युद्धापूर्वीच पाकिस्तानमध्ये मोठी फूट, एक अख्ख राज्य भारताच्या बाजुनं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 05, 2025 | 4:27 PM

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

एवढंच नाही तर भारतानं अटारी बॉर्डर देखील बंद केली आहे. आयात-निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत, टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यामुळे पाकिस्तानवरील दबाव प्रचंड वाढला आहे. युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र युद्धापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत फूट पडल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तनख्वामधील इस्लामिक धर्मोपदेशकानं मोठं वक्तव्य केलं आहे. जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पश्तून लोक भारतासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पश्तून लोक पाक सैन्याविरूद्ध भारतीय सैन्याला साथ देतील असं या धर्मोपदेशकानं म्हटलं आहे.

दुसरीकडे इस्लामाबादच्या लाल मशिदीमधील एका मौलानानं देखील असंच वक्तव्य केलं आहे. पाकमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतो, तितका भारतात होत नाही. भारतासोबत युद्ध लढायला कोण कोण जाणार? असा सवाल या मौलानानं मशिदीमध्ये केला होता,  तर मशिदिमध्ये उपस्थित असलेल्या एकानंही हात वर केला नाही. इस्लामचं युद्ध नसल्यामुळे कोणीही हात उंचावले नाही, असं म्हणत या मौलवीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याचं आता समोर आलं आहे. तुर्कीच्या नौदलाचं जहाज कराचीमध्ये दाखल झालं आहे.  हे जहाज सद्भावना म्हणून पाकिस्तानला आल्याचा दावा पाककडून करण्यात येत आहे.  मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे.