10000mAh बॅटरी असलेला ऑनरचा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, फीचर्सही उत्तम
ऑनर कंपनीचे हे स्मार्टफोन 10,000 एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच झाले आहेत. तर या दोन्ही फोनमध्ये प्रभावी डिस्प्ले आणि कॅमेरे आहेत. चला या हँडसेटची किंमत जाणून घेऊयात.

ऑनर कंपनीने त्यांचे स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केले आहेत. Honor Win आणि Honor Win RT असे दोन्ही स्मार्टफोन 10,000 एमएएच बॅटरीसह येतात. दोन्ही मॉडेल्समध्ये 16 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त दोन्ही स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. चला या दोन्ही हँडसेटची किंमत आणि ते कोणते वैशिष्ट्य देतात याबद्दल जाणून घेऊयात…
डिस्प्ले: या फोनमध्ये 185 हर्ट्झ रिफ्रेश रेट,6000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.83-इंचाचा फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले आहे.
चिपसेट : या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.
बॅटरी: या फोनमध्ये 10000 एमएएचची पॉवरफुल बॅटरी आहे जी 80 वॅट वायरलेस आणि 100 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे 27 वॅट रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
ऑनर विन किंमत
या स्मार्टफोनच्या 12जीबी /256 जीबी व्हेरिएंटची किंमत 3,999 युआ म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे 51,000 रूपये आहे. तर यातील 12 जीबी/512 जीबी व्हेरिएंटची किंमत 4,499 युआन म्हणजेच भारताच्या चलनानुसार 57,000 रूपये आहे. 16/512 जीबी व्हेरिएंटची किंमत 4,799 युआन म्हणजेच 61,000 रूपये आहेत आणि 16/1 टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,299 युआन म्हणजेच अंदाजे 60,000 रुपये आहे.
ऑनर विन आरटी या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले आणि प्रोसेसर: या फोनमध्ये ऑनर विन सारखाच डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर चालतो आणि त्यात अॅड्रेनो 830 जीपीयू आहे.
कॅमेरा सेटअप: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: 100 W वायर्ड फास्ट चार्जिंगसह 10000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
ऑनर विन आरटी किंमत
या स्मार्टफोनच्या 12/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2699 चिनी युआन अंदाजे 34,503 रुपये तर 12/512 जीबी व्हेरिएंटची किंमत 3099 चिनी युआन अंदाजे 39,617 रुपये आहे, 16/256 जीबी, 2999 चिनी युआन अंदाजे 36,000 रुपये आहे. 16/512 जीबी 3399 चिनी युआन भारतीय चलनानुसार अंदाजे 43,000 रुपये आणि 16/1 टीबी व्हेरिएंटची किंमत 3999 चिनी युआन अंदाजे 51,000 रुपये आहे. हे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले जातील की नाही हे सध्या माहित नाही. पण लवकरच लॉंच केले जाऊ शकतात.
