AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाची उडाली झोप, व्लादिमीर पुतिन यांचा थेट इशारा, भारताची भूमिका ठरली? आता युद्ध तर..

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. पुतिन अमेरिकेच्या नाकावर टिच्चून काही दिवसांपूर्वीच भारताच्या दाैऱ्यावर आले. त्यामध्येच त्यांनी आता थेट युक्रेन युद्धाबाबत मोठा इशारा दिला आहे.

जगाची उडाली झोप, व्लादिमीर पुतिन यांचा थेट इशारा, भारताची भूमिका ठरली? आता युद्ध तर..
Vladimir Putin
| Updated on: Dec 28, 2025 | 7:59 AM
Share

गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. दोन्ही देशातील संघर्ष टोकाला पोहोचला. मात्र, हे युद्ध थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. या युद्धाचा परिणाम फक्त दोन देशांना नाही तर अनेक देशांवर होत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबले पाहिजे अशी भूमिका जवळपास देशांची आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि हाच पैसा रशिया युक्रेन विरोधात लढण्यासाठी वापरत असल्याचा आरोप करत अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या युद्धाच्या झळा इतरही देशांना बसत आहेत. अमेरिकेने दिलेल्या शांतता प्रस्तावाला युक्रेननेच विरोध केला. परंतु या दोन्ही देशांमधील संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच भारताच्या दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान भारताने स्पष्ट केले की, भारत हा शांततेच्या बाजूने उभा आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच युक्रेनला इशारा देत म्हटले की, दोन्ही देशांमधील संघर्ष शांततापूर्ण मार्गांनी संपवण्यासाठी कीव कोणतीही तत्परता दाखवत नाहीये. पुतिन यांनी हा थेट आरोप केला. अमेरिकेने दिलेला पहिला शांतता प्रस्ताव आपल्याला मान्य असल्याचे रशियाने जाहीर केले होते. मात्र, अमेरिकेच्या प्रस्तावाला थेट युक्रेननेच विरोध केला. त्यामध्ये युक्रेनचे अध्यक्ष अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांचे अमेरिकेचे दाैरे वाढले आहेत.

पुतिन यांनी म्हटले की, जर युक्रेनला हा संघर्ष शांततेने सोडवायचा नसेल तर रशिया आपल्या विशेष लष्करीत आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य करेल. हा एकप्रकारे त्यांनी मोठा इशारा किंवा चेतावणीच दिली आहे. 500 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रांनी रशियाने कीववर हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे विधान केले.

रशियाने आरोप करत म्हटले की, मुळात म्हणजे युक्रेनला हे युद्ध शांततेत सोडवायचे नाहीये. मात्र, त्याकरिता आम्ही लष्कराच्या मदतीने आमचे टार्गेट पूर्ण करू असेही त्यांनी थेट म्हटले. पुतिन यांनी केलेल्या या विधानानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांमध्ये हा संघर्ष टोकाला पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आता यावर युक्रेन काय भूमिका घेतो हे पाहणेही महत्वाचे आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.