AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेत जाणाऱ्या मुलीला गाठलं अन् थेट ब्लेडने… मुंबईत थरकाप उडवणारी घटना

कांदिवलीच्या क्रांती नगरमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर भरदिवसा ब्लेडने हल्ला करून तिचे सोन्याचे लॉकेट लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळेत जाणाऱ्या मुलीला गाठलं अन् थेट ब्लेडने... मुंबईत थरकाप उडवणारी घटना
Kandivali
| Updated on: Feb 13, 2026 | 8:30 AM
Share

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आता लहान मुलेही सुरक्षित राहिलेली नाहीत, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना कांदिवली पूर्व भागात घडली आहे. क्रांती नगरमधील कर्नाटक चाळ गल्लीत एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर भरदिवसा ब्लेडने हल्ला करून तिचे सोन्याचे लॉकेट लुटण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कांदिवली परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काल दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून शाळेच्या दिशेने निघाली होती. ती कर्नाटक चाळ गल्लीतून जात असताना दबा धरून बसलेल्या एका अज्ञात नराधमाने तिला अडवले. आरोपीने अचानक मुलीच्या हातावर ब्लेडने वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी रडू लागली आणि गोंधळली. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावून घेतले. यानंतर गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

मुलीच्या अंगठ्याला गंभीर दुखापत

या हल्ल्यात चिमुरडीच्या हाताच्या अंगठ्याला मोठी आणि खोलवर जखम झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेमुळे ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे. शाळेत जाताना आमच्या मुलांवर असे हल्ले होत असतील, तर आम्ही त्यांना पाठवायचे कसे? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांविरोधात स्थानिकांचा संताप

या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, सुरुवातीला कुरार पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आम्ही तक्रार करायला गेलो तेव्हा सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे. या आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कुरार पोलिसांनी आता गुन्हा दाखल (FIR) केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी