AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सध्याच्या आणि निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते, पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. हा वेतन आयोग लागू कधी होणार याबाबत माहिती समोर आली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? मोठी अपडेट आली समोर
8th pay commission
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 11, 2025 | 3:27 PM
Share

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सध्याच्या आणि निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते, पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जानेवारीमध्येच याची घोषणा केली होती. आता हा वेतन आयोग लागू कधी होणार याबाबत माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परिषद-संयुक्त सल्लागार प्रणालीचे कर्मचारी बाजूचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना हा वेतन आयोग लवकरच लागू होणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची पगार रचना कशी आहे?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ता या घटकांचा समावेश असतो. अ‍ॅम्बिट इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार, या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकूण उत्पन्नाच्या 51.5 टक्के असतो. तर डीए सुमारे 30.9 टक्के, एचआरए सुमारे 15.4 टक्के आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी भत्ता सुमारे 2.2 टक्के असतो.

टीओआर म्हणजे काय?

टीओआर ही एक सिस्टीम आहे जी वेतन आयोगाला पगार ठरविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीची पूर्तता करते. टीओआर नसताना, आयोगाला अधिकृत मान्यता मिळत नाही. त्यामुळे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी हे महत्वाची भूमिका बजावते. तसेच मूलभूत वेतन रचना, भत्ते, पेन्शन आणि इतर बदलांमध्येही टीओआरची भूमिका महत्वाची असते.

आठवा वेतन आयोग पगारवाढीच्या शिफारसी कधी सादर करणार?

अँबिट इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या एका अहवालानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2025 च्या अखेरीस सादर केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी 206 पासून त्या लागू केल्या जाऊ शकतात. मात्र याला थोडाफार उशिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार?

आठव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. या शिफारसी लागू झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये 30-34 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतन आयोगाचा फायदा एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे. यात सध्याचे सुमारे 50 लाख सध्या कार्यरत असलेले कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त वेतनधारकांना लाभ मिळणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?