Bihar Boy Viral : ही पत्रकारिता नाही तर गुंडागर्दी, छोकरा नितीश कुमारना भिडला तर पत्रकार का ‘ए चूप’ म्हणतोय?

| Updated on: May 28, 2022 | 4:43 PM

14 वर्षीय सोनू कुमारने मुख्यमंत्र्यांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आणि विनंती केली की, 'सर मला शिक्षणासाठी हिम्मत द्या. माझे वडील मला शिवकायला तयार नाहीत'. त्या मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आता सोनू कुमारचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एक पत्रकार त्याच्याची पत्रकारिता नाही तर गुंडागिरीच्या भाषेत बोलताना दिसून येत आहे.

Bihar Boy Viral : ही पत्रकारिता नाही तर गुंडागर्दी, छोकरा नितीश कुमारना भिडला तर पत्रकार का ए चूप म्हणतोय?
सोनू कुमार आणि पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे 15 मे रोजी नालंदा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका 14 वर्षीय मुलाने आपल्या शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) साकडं घातलं होतं. कारण, त्या मुलाचे पालक त्याला शिकू देत नव्हते अशी त्याची तक्रार होती. नितीश कुमार आपल्या कल्याण बीघा गावाच्या दौऱ्यावर होते. ते आपले वडील कविराज रामलखन सिंह यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एका बागेतील पत्नी मंजूर सिन्हा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बॅरिकेटच्या मागे उभ्या असलेल्या 14 वर्षीय सोनू कुमारने (Sonu Kumar) मुख्यमंत्र्यांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आणि विनंती केली की, ‘सर मला शिक्षणासाठी हिम्मत द्या. माझे वडील मला शिवकायला तयार नाहीत’. त्या मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आता सोनू कुमारचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एक पत्रकार त्याच्याची पत्रकारिता नाही तर गुंडागिरीच्या भाषेत बोलताना दिसून येत आहे.

सोनू कुमारची नितीश कुमारांकडून मदतीची मागणी

पत्रकारिता कि गुंडागिरी?

एस्क्पोज मिडीया नावाच्या चॅनलचा एक पत्रकार सोनू कुमारला प्रश्न विचारताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच सोनू कुमार म्हणतो, की माझं स्वप्न आहे सैनिक शाळेत शिकण्याचं. त्यावेळी पत्रकार विचारतो की, तू नितीश कुमार यांच्याकडे तुझं कोणतं स्वप्न घेऊन गेला होता? सैनिक शाळेत की खासगी शाळेत शिकण्याचं? पत्रकाराने हा प्रश्न विचारल्यानंतर सोनू कुमार संतप्त आणि भावूक झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोनू कुमारही त्या पत्रकाराला आवाज चढवून बोलताना या व्हिडीओत दिसत आहे. तर पत्रकारही सोनू कुमारचं वय न लक्षात घेता त्याला चढ्या आवाजात वेगवेगळे प्रश्न विचारतो. काही वेळ त्या दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर सोनू कुमारसोबत असलेली दुसरी व्यक्तीही त्या पत्रकारावर चिढते. मात्र संबंधित पत्रकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. उलट तो जोरजोरात आणि मोठ्या आवाजात आपला मुद्दा मांडताना दिसत आहे. अन्शुल सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंडवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर ही पत्रकारिता कमी आणि गुंडगिरी जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सोनू सूदकडून सोनू कुमारला मदत

दरम्यान, अभिनेता सोनू सूदने 24 एप्रिल रोजी सोनू कुमारचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यात सोनू कुमारच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.