दिल्लीतून शाहनवाज हुसैन पाटण्यात गेले; थेट उद्योग मंत्री बनले

| Updated on: Feb 09, 2021 | 5:12 PM

बिहारमधील नितीशकुमार सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. (bihar Cabinet Expansion Shahnawaz Hussain Gets Ministerial Berth)

दिल्लीतून शाहनवाज हुसैन पाटण्यात गेले; थेट उद्योग मंत्री बनले
Follow us on

पाटणा: बिहारमधील नितीशकुमार सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांची वर्णी लागली आहे. दिल्लीतून थेट बिहारमध्ये आलेल्या हुसैन यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं आहे. (bihar Cabinet Expansion Shahnawaz Hussain Gets Ministerial Berth)

नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. त्यात भाजपच्या कोट्यातील नऊ आणि जेडीयूच्या कोट्यातील आठ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. आज एकूण नव्या 17 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 31 झाली आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात शाहनावज हुसैन उद्योगमंत्री असतील. याशिवाय नीरजकुमार सिंह यांना पर्यावरण, वन आणि जलवायू मंत्रालय देण्यात आलं आहे. भाजप आमदार नितीन नवीन यांच्याकडे रस्तेबांधकाम मंत्रीपद देण्यात आलं आहे.

वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री

शाहनवाज हुसैन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अत्यंत जवळचे होते. ते 2003 ते 2004 पर्यंत वाजपेयींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते. त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात 1999 पासून सुरू झाली. अत्यंत कमी वयात त्यांना केंद्रीय मंत्री बनविण्यात आलं होतं. त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास, युवा, क्रीडा, खाद्य आणि उद्योग आदी विभाग होते. 2001मध्ये ते खाण मंत्री होते. नंतर नागरी उड्डायन मंत्री होते. 2003मध्ये वस्त्रोद्योग मंत्रीही होते. 2004मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2006मध्ये ते भागलपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते अत्यंत कमी मताने पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना 2019मध्ये तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळेच त्यांचं बिहारमध्ये पुनर्वसन करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

भाजपच्या कोट्यातील मंत्री

आज भाजपच्या कोट्यातून शाहनावज हुसैन, सम्राट चौधरी, नीरज सिंह, सुभाष सिंह, नितीन नवीन, प्रमोद कुमार, जनक राम, आलोक रंजन झा, नारायण प्रसाद यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

जेडीयू कोट्यातील मंत्री

तर, मदन सहनी, श्रवण कुमार, संजय झा, लेसी सिंह, सुमित कुमार सिंह, सुनील कुमार, जयंतर राज, जमा खान आदींना जेडीयच्या खात्यातून मंत्रिपद देण्यात आलं आहे. जमा खान यांनी नुकताच बसपातून जेडीयूमध्ये प्रवेश केला असून त्यांनाही नितीशकुमार यांनी मंत्रिपद दिलं आहे.

भाजप मंत्र्यांना मिळालेले खाते

शाहनवाज हुसैन – उद्योगमंत्री
सुभाष सिंग – सहकार मंत्री
नितीन नवीन – रस्ते बांधकाम मंत्री
प्रमोद कुमार – ऊस उद्योग विभाग
सम्राट चौधरी – पंचायत राज विभाग
आलोक रंजन झा – संस्कृती, संस्कृती आणि युवा विभाग
जनक राम – खाण विभाग
नारायण प्रसाद – पर्यटन विभाग
नीरजसिंग बबलू – पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग

जेडीयूच्या मंत्र्यांची खाती

संजय झा – जलसंपदा, माहिती आणि जनसंपर्क सहकारी
श्रावण कुमार – ग्रामविकास विभाग
मदन साहनी – समाज कल्याण विभाग
जयंत राज – ग्रामीण बांधकाम विभाग
लेसी सिंग – अन्न आणि ग्राहक संरक्षण विभाग
सुमित सिंग – विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
ठेवीदार खाण – अल्पसंख्याक विभाग
सुनील कुमार – दारू बंदी, उत्पादन विभाग

काय आहे भाजपची खेळी?

अनेक वर्षांपासून दिल्लीत रुळलेल्या शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये पाठवण्याचा निर्णय अनपेक्षित मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानपरिषदेच्या निवडणुकीत शाहनवाज हुसैन यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हुसैन यांनाही आपल्याला बिहारमध्ये जावे लागेल, याची कल्पना नव्हती. आता यामागे भाजपने नक्की काय गणिते आखली आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (bihar Cabinet Expansion Shahnawaz Hussain Gets Ministerial Berth)

 

संबंधित बातम्या:

लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!

म्हणून आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो, नवनीत राणांची लोकसभेत फटकेबाजी

जेव्हा काँग्रेस नेत्याला निरोप देताना मोदींनी तीनदा अश्रू पुसले, 5 मिनिटे 15 सेकंद तुम्हाला समृद्ध करतील 

(bihar Cabinet Expansion Shahnawaz Hussain Gets Ministerial Berth)