Bihar Election Result 2020 | शत्रुघ्न सिन्हांचा मुलगाच ‘खामोश’, लव सिन्हाला पराभवाचा धक्का

काँग्रेस उमेदवार लव सिन्हा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 15 हजारांच्या आसपास मतं त्यांच्या पारड्यात पडली.

Bihar Election Result 2020 | शत्रुघ्न सिन्हांचा मुलगाच 'खामोश', लव सिन्हाला पराभवाचा धक्का
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 7:11 PM

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचे सुपुत्र, तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचा भाऊ लव सिन्हा (Luv Sinha) याला पराभवाचा धक्का बसला आहे. बांकीपूर (Bankipur) विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितीन नवीन (Nitin Nabin) यांनी लवला ‘खामोश’ केले. (Bihar Election Result 2020 Shatrughan Sinha’s son Luv Sinha lost from Bankipur Vidhansabha Seat LIVE Updates)

बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन नवीन हे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी 33 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला. एकूण मतांपैकी 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतं नवीन यांना मिळाली. जवळपास 18 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले.

काँग्रेस उमेदवार लव सिन्हा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 15 हजारांच्या आसपास मतं त्यांच्या पारड्यात पडली. विशेष म्हणजे स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार घोषित करणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Chaudhari) बांकीपूरमधूनही रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अवघी 1991 मतं मिळवत त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. चौधरी या निवडणूक लढवण्यासाठी लंडनहून आल्या होत्या. बांकीपूरमधून एकूण 22 उमेदवार नशीब आजमावत होते.

शत्रुघ्न सिन्हांचा बालेकिल्ला

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा पटना साहिब लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले, मात्र भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सिन्हांना पराभवाची धूळ चारली होती.

“तेजस्वी यादव यांचा अनुभव कमी आहे, असं म्हणणारे विरोधक येत्या 10 तारखेला निवडणूक निकालानंतर पूर्णपणे खामोश होतील. कारण बिहारच्या जनतेला आता जुमलेबाजी नकोय तर विकास करुन दाखवणारं सरकार हवंय आणि लोकांची हीच अपेक्षा महागठबंधनचे सरकार पूर्ण करेल”, असं शत्रुघ्न सिन्हा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. तेजस्वी यांच्या युवा ब्रिगेडमध्ये असलेले लव सिन्हा आणि अन्य साथी मिळून बिहारचा चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास बिहारी जनतेमध्ये दिसून येत आहे” असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते. (Bihar Election Result 2020 Shatrughan Sinha’s son Luv Sinha lost from Bankipur Vidhansabha Seat LIVE Updates)

संबंधित बातम्या :

तेजस्वी यादवांचे टीकाकार 10 तारखेला ‘खामोश’ होणार, शत्रुघ्न सिन्हांची फटकेबाजी

(Bihar Election Result 2020 Shatrughan Sinha’s son Luv Sinha lost from Bankipur Vidhansabha Seat LIVE Updates)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.