आता NDA चं सरकार कोसळणार, या राज्यात मोठी उलथापलथ? लवकरच…बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ!

बिहारच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होणार आहे. एनडीएमध्ये सगळंकाही आलबेल नाहीये. एनडीएत लवकरच मोठा स्फोट होणार आहे, असा खळबळजनक दावा भाई वीरेंद्र यांनी केलाय.

आता NDA चं सरकार कोसळणार, या राज्यात मोठी उलथापलथ? लवकरच...बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ!
nitish kumar and narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 5:56 PM

Bihar NDA : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. तिकडे जम्मू काश्मीरमध्ये सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात 20 ते 25 आमदार नाराज असल्याचे बोलले जातेय. याच कारणामुळे तिथे सत्तापालट होते की काय, असा प्रश्न विचारला जातोय. एकीकडे जम्मू-काश्मीरच्या राज्यात खळबळ उडालेली असताना आता दुसरीकडे बिहारमध्येही मोठं काहीतरी घडणार असल्याचं बोललं जातंय. बिहारच्या सत्ताधारी एनडीए पक्षात मोठी उलथापलथ होऊ शकते, असा दावा केला जातोय. या दाव्यावर भाजपानेही प्रतिक्रिया दिलीय.

नेमका काय दावा करण्यात आला?

बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार असल्याचे बोलले जातेय. राष्ट्रीय जनता दल म्हणजेच राजदचे वरिष्ठ नेते तथा आमदार भाई वीरेंद्र यांनी मोठा दावा केलाय. बिहारच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होणार आहे. एनडीएमध्ये सगळंकाही आलबेल नाहीये. एनडीएत लवकरच मोठा स्फोट होणार आहे, असा खळबळजनक दावा भाई वीरेंद्र यांनी केलाय.

Loading...

लवकरच नवा खेळ सुरू होणार

“नितीश कुमार सगळं समजून घेत आहेत. कोणता नेत्या कोणत्या पक्षाला सोबत घेऊन राजकीय डावपेच आखतोय, एमएलसी निवडणुकीत जदयूला कसं पराभूत करण्यात आलं, हे सगळं ते समजून घेत आहेत. त्यामुळे आता नवा खेळ लवकरच सुरू होणार आहे. थोडा वेळ वाट पाहा,” असंही सूचक विधान त्यांनी केलंय. त्यांच्या या विधानानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

भाजपाने समोर येऊन सगळं सांगितलं

वीरेंद्र यांच्या विधानांतर बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बिहारचं राजकीय समीकरण बदलणार का, असं विचारलं जातंय. वीरेंद्र यांच्या दाव्यानंतर भाजपाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी समोर येत पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय. भाई वीरेंद्र यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी हा दावा केलाय. अफवा पसरवण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे नीरज कुमार यांनी सांगितलेय. तसेच, भाई वीरेंद्र यांनी त्यांचा पक्ष तसेच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलहाकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावलाय. त्यामुळे आता बिहारमध्ये नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us