विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोण ? भाजपची राज्य प्रभारींची नवी यादी जाहीर
भाजपने नुकतीच राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची नवीन यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्मृती इराणींना हरियाणा-छत्तीसगडची, तर विनोद तावडेंना उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्रासाठी वैजयंत जय पांडा यांची नियुक्ती झाली आहे. सुनील बन्सल पश्चिम बंगाल-तेलंगणा सांभाळतील. पक्षाच्या आगामी रणनीतीसाठी ही महत्त्वपूर्ण फेरबदल आहेत.

भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी बैजयंत जय पांडा यांच्या नियुक्ती झाली असून अमित मालवीय, सदानंद शेर्ट तनावाडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी आहेत. दरम्यान सुनील बन्सल यांना यांच्याकडे पश्चिम बंगाल आणि तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राम माधव हे उत्तराखंडचे नवे प्रभारी असतील, तर बांसुरी स्वराज यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे भाजपच्या दिल्ली युनिटच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जमयांग नामग्याल आणि दर्शना जरदोश यांना सहप्रभारी करण्यात आलं आहे. तसेच संजय भाटिया यांची राजस्थानच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कविता पाटीदार आणि कुलजीत चहल यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
याशिवाय हरीश द्विवेदी यांची बिहार आणि कर्नाटकसाठी, तर तरुण चुग यांची गुजरातसाठी प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. राम माधव यांची तामिळनाडू, राजीव रॉय यांची मणिपूर आणि डी. पुरंदेश्वरी यांची ओडिशासाठी भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाने बिप्लव देव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवलं आहे, तर भारती पवार गोवा, सतीश पुनिया यांना पंजाब आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी म्हणून नियुक्त केलं. या व्यतिरिक्त अनिल बलूनी यांना भाजपा कम्युनिकेशन सेलचे को-ऑर्डिनेटर आणि आशीष अग्रवाल यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
6 नेत्यांकडे एकापेक्षा अधिक राज्याची जबाबदारी
स्मृती इराणी : छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारी
हरीश द्विवेदी : बिहार आणि कर्नाटकचे प्रभारी
डॉ. सतीश पूनिया : जम्मू-काश्मीर आणि पंजाबचे प्रभारी
राम माधव : तामिळनाडू आणि उत्तराखंडचे प्रभारी
सुनील बन्सल : तेलंगणा आणि पश्चिम बंगालचे प्रभारी
अनिल अँटोनी : नागालँडचे प्रभारी आणि गोव्याचे सहप्रभारी
बिहारच्या अनेक नेत्यांना महत्वाची जबाबदारी
हरीश द्विवेदी यांची बिहार भाजपच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रोहन गुप्ता आणि संगीता यादव यांची बिहारच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बिहार भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार मंगल पांडे यांची आसामच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगल पांडे बिहार सरकारमध्ये मंत्रीही होते.
बिहारमधील आणखी एक नेते आणि माजी विधान परिषद सदस्य देवेश कुमार यांची अरुणाचल प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. देवेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी रिक्त केलेल्या जागेवर मंत्री दीपक प्रकाश विधान परिषद सदस्य झाले होते. मंत्री दीपक प्रकाश हे उपेंद्र कुशवाहा यांचे पुत्र आहेत. बिहारमधील भाजपच्या विधान परिषद सदस्या निवेदिता सिंह यांची झारखंडच्या सहप्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. बिहारमधून येणारे राजेंद्र सिंह यांची पश्चिम बंगालच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारच्या पिंकी कुशवाहा यांचीही पश्चिम बंगालच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे.