Rajya Sabha Election: कर्नाटकात भाजपचा तीन जागांवर कब्जा; निर्मला सीतारामन, अभिनेते जगेश आणि लहरसिंग सिरोया विजयी

| Updated on: Jun 10, 2022 | 10:35 PM

कर्नाटकात भाजपच्या निर्मला सीतारामन, जगेश आणि लहारसिंग सिरोया यांनी चारपैकी तीन जागा जिंकल्या. काँग्रेसचे जयराम रमेश हे एकमेव जागेवर विजयी झाले.

Rajya Sabha Election: कर्नाटकात भाजपचा तीन जागांवर कब्जा; निर्मला सीतारामन, अभिनेते जगेश आणि लहरसिंग सिरोया विजयी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Image Credit source: tv9
Follow us on

rajya Sabha Election: कर्नाटकमधील राज्यसभेच्या निवडणूकीचा (Rajya Sabha Election) निकाल हाती आला आहे. येथे राज्यासभेच्या चार जागांसाठी निवडणूक लागली होती. ज्यात भाजपने (BJP) तीन आणि काँग्रेसने एका जाग्यावर विजय मिळवला आहे. भाजपकडून अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman), अभिनेता जिग्गेश आणि लहर सिंह सिरोया हे विजयी झाले आहेत. तर भाजप हा विजय म्हणजे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) म्हणजेच जेडीएसला कर्नाटकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. तर जेडीएसला एकही जागा जिंकता आली नाही.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल भाजपने राजस्थानच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांना निलंबित केले आहे. शोभाराणी कुशवाह यांनी आज राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करत ‘क्रॉस व्होट’ केले. कारवाई करत पक्षाने व्हीके यांना निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे. मतदानाची घोषणा झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही माहिती दिली. “आमच्याकडे 71 मते होती, त्यापैकी पहिल्या पसंतीची 43 मते आमचे उमेदवार घनश्याम तिवारी यांना 27 मते (अपक्ष उमेदवार) सुभाष चंद्रा यांना गेली,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आमचे एक मत क्रॉस व्होट होते. ते शोभाराणी कुशवाह यांनी केले.

शोभाराणी कुशवाह यांना सात दिवसांची नोटीस

कटारिया यांच्या म्हणण्यानुसार, भाजप आमदाराने हे मत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना दिले. ते म्हणाले की, आमदाराने पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करून अनुशासनाचा भंग केला आहे. “आम्ही आमदार कुशवाह यांना तात्काळ निलंबित केले आहे. पक्षप्रमुखांना कळवल्यानंतर आम्ही त्यांना सात दिवसांची नोटीस दिली आहे. त्यांच्या उत्तराच्या आधारे त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व संपुष्टात येईल. शोभराणी या कुशवाह धौलपूच्या आमदार आहेत.

हे सुद्धा वाचा

राजस्थानमध्ये काँग्रेसने झेंडा

कर्नाटक व्यतिरिक्त राजस्थानच्या राज्यसभेच्या जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. येथे सत्ताधारी काँग्रेसने झेंडा फडकावत तीन जागा काबीज केल्या आहेत. काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक विजयी झाले आहेत. तर भाजपला एक जागा मिळाली आहे. भाजपकडून घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. येथे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्र-हरियाणातील मतमोजणीला उशीर

महाराष्ट्र आणि हरियाणातील राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे विलंब झाला. भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीचे (MVA) तीन आमदार कॅबिनेट मंत्री असल्याचा आरोप केल्यानंतर मतमोजणी रखडली. जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), यशोमती ठाकूर (काँग्रेस) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतदानासंबंधीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, “आम्ही निवडणूक आयोगाकडे त्यांचे मत अवैध घोषित करावे, अशी मागणी केली आहे.