मोठी राजकीय घडामोड! भाजपच्या बड्या नेत्याने घेतली माजी मुख्यमंत्र्यांची भेट, लवकरच…

उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. भाजपच्या बड्या नेत्याने माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली.

मोठी राजकीय घडामोड! भाजपच्या बड्या नेत्याने घेतली माजी मुख्यमंत्र्यांची भेट, लवकरच...
bjp politicial news
Image Credit source: tv9
| Updated on: Oct 11, 2026 | 9:06 PM

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांकडून तिकीटासाठी चाचपणी सुरू झाली आहे. तसेच नेत्यांमध्ये पक्ष बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. भाजपचे माजी खासदार धर्मेंद कश्यप यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली.  धर्मेंद्र कश्यप यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अखिलेश यादव यांनी स्वत: भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अखिलेश यादव यांनी म्हटलं की, ‘उत्तर प्रदेशच्या आंवला लोकसभा मतदारसंघात दोन वेळा धर्मेंद्र कश्यप यांनी नेतृत्व केलं आहे. त्यांनी  ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याक समाजाची चळवळ (PDA)  मजबूत आणि सक्रिय करण्यासाठी चर्चा केली. या चळवळीतच पीडित, दु:खी, अपमानित व्यक्तीला योग्य स्थान मिळते’. खरंतर धर्मेंद्र कश्यप यांनी भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत. ते भाजप सोडून लवकरच नव्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. सर्मथकांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर ‘टाटा बाय बाय’ म्हणत पोस्ट केली होती. भाजपने राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर कश्यप यांनी ही पोस्ट केली होती. ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading...

 

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमधील ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले धर्मेंद्र कश्यप यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु त्यांचं नाव यादीत आलं नाही. भाजपने बरेलीमधील माजी राज्यमंत्री धर्मपाल सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांची मुलगी श्रुती गंगवार यांना मैदनात उतरवलं आहे. पण त्यांना उमेदवारी देऊ केली नाही. धर्मेंद्र कश्यप यांनी अद्याप राजीनाम्याची घोषणा केलेली नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माझ्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याने नाराज असल्याचे म्हटलं होतं. तुम्ही समाजवादी पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर धर्मेंद्र कश्यप म्हणाले होते की, माझी पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, तुम्हाला लवकरच समजेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us