भाजप आमदाराची अतिक्रमण हटवणाऱ्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने अतिक्रमण हटवणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला थेट बॅटनेच जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

भाजप आमदाराची अतिक्रमण हटवणाऱ्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 3:54 PM

इंदुर: भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने अतिक्रमण हटवणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला थेट बॅटनेच जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. संबंधित आमदाराचे नाव आकाश विजयवर्गीय आहे. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय हे त्यांचे वडील आहेत.

संबंधित अधिकारी इंदुरच्या गंजी कंपाऊंड परिसरातील एका इमारतीचे अतिक्रमण काढायला गेले होते. दरम्यान, आमदार आकाश विजयवर्गीय यांनी त्या ठिकाणी येऊन पालिका अधिकाऱ्यांना धमकी देत 5 मिनिटात तेथून जाण्यास सांगितले. यावेळी आमदार विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी पोकलेन मशीनची चावी काढून घेतली. त्यानंतर पालिका अधिकारी आणि आमदार विजयवर्गीय यांच्यात वाद झाला.

वाद सुरु असतानाच आमदार विजवर्गीय यांनी अधिकाऱ्याला बॅटने मारण्यास सुरुवात केली. यानंतर बराच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद थांबवला. माध्यमांशी बोलताना आमदारांनी आपण रागात असल्याने मारहाण केल्याचे सांगितले. मात्र, ही केवळ सुरुवात आहे. यापुढेही अशाचप्रकारे विनंती, निवेदन आणि मग दणादण या पद्धतीने काम करु, असे सांगितले.

यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन म्हणाले, “कितीही मोठा नेता का असेना, कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.