भाजप आमदाराचा एक्स्प्रेस -वे वर भीषण अपघात, फॉर्च्यूनरचे टायर फुटले अन्…, पावसाच्या पाण्याने मोठा घात केला
भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. एक्स्प्रेस वे वर पावसाच्या पाण्यामुळे कार स्लीप झाल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पोलला धडकी आहे.

उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. बुलंदशहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोटा कबूलपूर गावाच्या परिसरात गंगा एक्स्प्रेस -वे वर एक मोठा अपघात घडला आहे. बुलंदशहरच्या डिबाई विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. गंगा एक्स्प्रेस वे वर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. या पाण्यामुळे कार स्लीप झाली आणि कार खांबाला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये आमदार चंद्रपाल सिंह लोधी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आमदारासोबतच त्यांचा गनर आणि चालक देखील जखमी झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 63 वर्षीय आमदार चंद्रपाल सिंह लोधी हे लखनऊन बुलंदशहराकडे निघाले होते. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची गाडी गंगा एक्स्प्रेस वे वरून पोटा कबूलपूर गावाच्या परिसरात आली कार भरधाव वेगात होती. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणी साचलं होतं. कार पाण्यामुळे स्लिप झाल्याने चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार तिथे असलेल्या एका खांबाला जाऊन धडकली. या अपघातामध्ये आमदार चंद्रपाल सिंह लोधी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा गनर आणि चालक देखील या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामध्ये कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर कारचं टायर देखील फुटले तसेच समोरचा संपूर्ण भाग मोठ्या प्रमाणात डॅमेज झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एम्स रुग्णालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. चंद्रपाल सिंह यांचं कुटुंब देखील रुग्णालयात दाखल झालं आहे.