AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, पराभवानंतर काँग्रेसचा गंभीर आरोप काय?

Manjalpur Bypoll Result : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजळपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सतेंद्रभाई पटेल उर्फ सतीश पटेल यांनी 30,630 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, पराभवानंतर काँग्रेसचा गंभीर आरोप काय?
Satish Patel won manjalapur byelectionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 03, 2026 | 4:51 PM
Share

देशातील विविध राज्यातील पोटनिवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहेत. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजळपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सतेंद्रभाई पटेल उर्फ सतीश पटेल यांनी 30,630 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या निवडणुकात सतीश पटेल यांना एकूण 55,481 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांना 24,851 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 30 जुलै रोजी मतदान पार पडले होते. आज 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. यात भाजपणे दणदणीत विजय मिळवला आहे.

हा विजय पूर्णपणे जनतेचा – सतीश पटेल

मांजळपूर पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयानंतर माध्यमांशी बोलताना सतीश पटेल यांनी या यशाचे श्रेय मांजळपूरमधील जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. सतीश यांनी म्हटले की, ‘मांजळपूरच्या जनतेने जसा दिवंगत योगेश काका यांच्यावर विश्वास दाखवला होता, तसाच अभूतपूर्व आशीर्वाद मला देखील दिला आहे. हा विजय पूर्णपणे जनतेचा विजय आहे. मी जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन. मी मतदारसंघाचा विकास, चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित कामांना प्राधान्य देणार आहे.

पराभवानंतर काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांनी पराभव स्वीकारत जनतेचा कौल स्वीकारत असल्याचे विधान केले आहे. पुढे बोलताना रबारी यांनी आरोप केला की, ‘निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले, त्यामुळे निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष झाली नाही.’ पुढे आपल्या समर्थकांचे आणि मतदारांचे आभार मानत, जनतेच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

योगेश पटेल निधनानंतर पोटनिवडणूक

भाजपचे ज्येष्ठ आमदार योगेश पटेल यांच्या दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर मांजळपूर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. 2008 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या मांजळपूर मतदारसंघावर तेव्हापासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. दिवंगत योगेश पटेल यांनी 2012, 2017 आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून सलग मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आता सतीश पटेल यांच्या विजयामुळे ही जागा भाजपकडेच राहणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी