Railway News : ट्रेनमध्ये आता ब्लँकेटला कव्हर मिळणार, या स्थानकातून झाली सुरुवात

भारतात रेल्वे हा प्रवासाचा सर्वात स्वस्त आणि आरामदायी पर्याय आहे. भारतीय रेल्वेने दररोज २ कोटी प्रवासी प्रवास करत असतात. गेल्या सणासुदीच्या दिवसात ४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी रेल्वेने ३ कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याचा विक्रम घडला आहे.

Railway News : ट्रेनमध्ये आता ब्लँकेटला कव्हर मिळणार, या स्थानकातून झाली सुरुवात
Ashwini Vaishnav
| Updated on: Oct 16, 2025 | 9:50 PM

मेल- एक्स्प्रेसच्या प्रवास स्लीपर कोचने प्रवास करताना सगळ्यात मोठी अडचण ब्लँकेटच्या स्वच्छतेबाबत असते. आता रेल्वेने यावर देखील तोडगा काढला आहे. आता रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांना ब्लँकेटला कव्हर पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना ब्लँकेट निर्धास्तपणे वापरता येणार आहेत. जयपूर रेल्वे स्थानकातून याचा शुभारंभ झाला आहे. राजस्थानच्या ६५ स्थानकात ही सुविधा सुरु झाली असून इतरत्रही अशी सुविधा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.

ट्रेनच्या ब्लँकेटबाबत संशय

ट्रेनमधून लांबचा प्रवास करताना आपल्याला ब्लँकेट संदर्भात नेहमीच संशय येत असतो. ते स्वच्छ असतील की नाही. त्यांची वेळेत धुलाई होत असेल की नाही. एकच ब्लँकेट किती प्रवासी वापरत असतील यावरुन ना – ना कुशंका प्रवाशांच्या मनात येत असतात. याचा समस्येचा निपटारा करण्यासाठी आता ब्लँकेटला कव्हर लावण्याचा तोडगा रेल्वेने काढला आहे. याची प्रायोगिक स्वरुपात सुरुवात राजस्थानची राजधानी जयपूर येथून एका ट्रेनमधून झाली आहे.

आज १६ ऑक्टोबर रोजी जयपुरच्या दौऱ्यावर आलेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जयपूरातील खातीपुरा रेल्वे स्थानकात प्रवाशांना ब्लँकेट सोबत कव्हर देण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जयपूर ते अहमदाबादला रवाना झालेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रिंटेड लिनन ब्लँकेट कव्हर दिले.

जयपुर-अहमदाबाद ट्रेनने सुरुवात

यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की ही नवीन सुरुवात प्रवाशांच्या जीवनात एक मोठा बदल करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की ब्लँकेचा पर्याय अनेक वर्षांपासून रेल्वेत होत आहे. परंतू प्रवाशांच्या मनात संशय असतो.त्याला दूर करण्यासाठी आजपासूनच ब्लँकेटवर कव्हरची व्यवस्था जयपुरच्या एका गाडीतून प्रायोगित तत्वावर होत आहे. जर यात यश आले तर हाच प्रयोग देशभरात केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथे पोस्ट पाहा –

६५ रेल्वे स्थानकात सुविधा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी छोट्या स्थानकातूही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला जात आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, त्यांची लांबी वाढवणे, कोच आणि ट्रेनची संख्येची माहिती देण्यासाठी साईनबोर्डसारखी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात होता. या अंतर्गत राजस्थानच्या ६५ छोट्या स्थानकात चांगल्या सुविधांची सुरुवात केली जात आहे. ही सर्व स्थानकं राजस्थानच्या जवळपास सर्व रेल्वे मंडळामध्ये मोडतात. ज्यात जयपूर, जोधपूर, बिकानेर आणि अजमेर मंडळाचा समावेश आहे.

येथे पोस्ट पाहा –

अश्विनी वैष्णव म्हणाले की अनेक स्थानकं अशी आहेत तेथे अशा प्रकारच्या कामांची कधी कल्पना देखील कोणी केली नसेल, परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्हाला प्रेरणा दिली आहे की छोट्याच छोट्या स्थानकांवरही लक्ष द्यायचे आहे.