अरुंधती रॉय यांच्यावर कश्मीरबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तब्बल 14 वर्षांनी खटला चालणार ? काय होते वक्तव्य ?

21 ऑक्टोबर 2010 रोजी दिल्लीतील एलटीजी ऑडिटोरियम, कोपर्निकस रोड येथे 'आझादी - द ओन्ली वे' नावाची परिषद झाली होती, ज्यामध्ये अरुंधती रॉय आणि प्रा. शौकत हुसेन यांनी वादग्रस्त भाषण केले होते.

अरुंधती रॉय यांच्यावर कश्मीरबद्दलच्या त्या वक्तव्यामुळे तब्बल 14 वर्षांनी खटला चालणार ? काय होते वक्तव्य ?
booker winner arundhati roy
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 15, 2024 | 1:03 PM

बुकर पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर आणि कश्मीर सेंट्रल युनिव्हर्सिटीतील आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्रोफेसर डॉ. शेख शौक हुसेन यांच्याविरोधात  14 वर्षे जुन्या प्रकरणात खटला उभारण्यास  दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी मंजूरी दिली आहे. कश्मीरबाबत कठोर बेकायदा कृती ( प्रतिबंधक ) कायद्याच्या ( UAPA ) कलम 45 ( 1) खटला चालणार आहे. दिल्लीच्या कोपरनिकस स्थित एलटीजी ऑडिटोरियममध्ये 21 ऑक्टोबर 2010 मध्ये ‘आजादी-द ओन्ली वे’ नावाच्या एका परिषेदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अरुंधती रॉय आणि प्रो. शौकत हुसैन यांनी सहभाग घेतला होता.

दिल्ली येथील दहा वर्षांपूर्वी झालेल्या या कॉन्फरन्समध्ये अरुंधती रॉय आणि प्रो.शौकत हुसैन आणि कश्मीरचे सैयद अली शाह गिलानी, एसएआर गिलानी ( परिषदेतील वक्ते आणि संसद हल्ल्यात फाशी झालेले ) आणि वरवरा राव सह अन्य वक्ते देखील सामील झाले होते. सैयद अली शाह गिलानी आणि एस.आर. गिलानी यांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांना अरुंधती रॉय आणि शेख शौकत हुसैन यांच्या वर भारतीय दंड संहिता कलम UAPA च्या कलम 124A, 153A, 153B, 504, 505 आणि कलम 13 अंतर्गत खटला चालवण्यासाठी उपराज्यपालांकडून परवानगी मागितली होती. दिल्ली च्या राज्यपालांनी ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केवळ आयपीसी अंतर्गत खटला चालविण्याची अनुमती दिली होती.

कठोर बेकायदा कृती ( प्रतिबंधक ) युएपीए कायदा कलम 13 अंतर्गत भडकाऊ वक्तव्ये करणे, जमावाला उकसवणे या अंतर्गत सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहिता कलम 124 अ राजद्रोह, 153 A धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याशी संबंधित आहेत, तर 153 B कलम राष्ट्राच्या सार्वभौमत्वाशी संबंधित आहे आयपीसी कलम 504 अंतर्गत जानून बूजून अपमानित करणे. कलम 505 अंतर्गत जाणूनबुजून शांतताभंग करण्याशी संबंधित आहे. ही परिषद काश्मीरमध्ये तणाव असताना झाली होती. यावेळी आंदोलनात तुफैल अहमद मट्टू नावाच्या 17 वर्षीय तरुणांची अश्रूधुरांच्या नळकांड्यांनी जखमी होऊन मृत्यू झाला होता.

सर्वोच्च पुरस्कार आणि वादग्रस्त वक्तव्य

लेखिका अरुंधती रॉय यांनी कश्मीर हा भारताचा भाग नव्हता, त्याच्यावर भारताने शस्रांच्या बळाने ताबा मिळविला आहे असे वादग्रस्त वक्तव्य यांनी परिषदेत केले होते. या प्रकरणानंतर कश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडीत यांनी अरुंधती रॉय यांच्यावर तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी या तक्रारीवरुन महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशा दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल केली होती. अरुंधती रॉय यांना ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कांदबरीबद्दल 1997 मध्ये बुकर प्राईज मिळाले होते. हा पुरस्कार जिंकणारी ही पहीली भारतीय महिला लेखिका आहे.