
भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सध्या टेन्शन सुरु असताना बॉर्डरवर सैनिकांना नेहमीच अलर्ट राहावे लागत असते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्रधारी आहेत. त्यामुळे सीमेवरील बंकर देखील तेथील सैन्य आणि गावकऱ्याच्या जीवितहानी होऊ नये म्हणून उपयोगी पडत असतात. पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर नेहमीच गोळीबार करीत असतात.त्यात अनेक निष्पाप लोकांचे देखील बळी जात असतात. अशात पहलगाम हल्ल्यानंतर आता टेन्शन आणखीन वाढले आहे. त्यामुळे सीमेवरील बंकर पुन्हा चर्चेत आले आहे.
पहलगामवरील २२ एप्रिलच्या अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देश अलर्टमोडवर आहे. खासकरुन जम्मू-कश्मीर आणि सीमावर्ती भागातील जेवढे भाग आहेत. येथे सर्व ठिकाणी सैन्य तैनात केले असून अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशात बातम्या आल्या होत्या की पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर बंकर्सची साफसफाई पाकिस्तानने सुरु केली आहे. या बंकर्समध्ये पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या गोळीबाराच्या वेळी गावकर आश्रय घेत असतात. चला तर पाहूयात बंकर्समध्ये कशा प्रकारचे संरक्षण असते.
सैनिकांसाठी बंकर्सचे महत्व खूप असते. वेगवेगळ्या हल्ल्यात वाचवण्यासाठी बंकर्स निर्माण केले जातात. सर्वसाधारणपणे सीमेच्या जवळ काही खास जागांवर बंकर्स बांधले जातात. काही वेळा काही नेत्यांच्या किंवा राष्ट्रप्रमुखांच्या निवासस्थानाबाहेर देखील बंकर बनवले जातात. आपात्कालिन स्थितीत या बंकरमध्ये आश्रय घेता येतो. शत्रूच्या गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकर खुपच कामी येतात.
भारतच नाही तर जगातील सर्व सैनिक बंकर्स बनवत असतात. बंकर्स जमीनीखाली असलेल्या घरासारखे देखील असतात. या बंकरच्या भिंती अनेक फूट जाड असतात. जी काँक्रीट वा लोखंडापासून बनलेले असतात. भारतात बंकर्स तयार करण्यासाठी सर्वसामान्यपणे प्री-कास्ट कंस्ट्रक्शन मेथडोलॉजीचा वापर केला जातो. यात जमीनीवर लोखंडाच्या साच्यात काँक्रीट भरले जाते. बंकरच्या भिंती आणि छत कारखान्यात तयार केले जाते. ज्यांना आधीच सेट ढाच्यात फिट्ट केले जाते.
बंकरमध्ये सुरक्षेची काळजी घेतली जाते. दुश्मनांच्या हल्ल्यापासून ते खास सुरक्षित असतात. पाणी, किटाणू, साप आणि विंचू पासूनही ते सुरक्षित असतात. आधीच साच्यापासून तयार केलेले प्रीकास्ट बंकर दोन ते तीन दिवसात बांधून पू्र्ण होते. बंकर्समध्ये हवा खेळती रहावी यासाठी ब्लास्ट व्हॉल्व लावलेले असतात. ज्यातून प्रकाश देखील आत येतो. आजूबाजूला धमाका झाल्यावर हे वॉल्व ओटोमेटीक बंद होतात. यात सैनिकांसह सर्व सामान्य गावकरी देखील सुरक्षित राहील याची पुरेपुर काळजी घेतलेली असते.
सर्वसाधारण बंकर्स तर बुलेटप्रुफ असतात. परंतू हे बंकर्स अणू हल्ला झेलू शकत नाहीत. आण्विक हल्ला झेलू शकणारे बंकर्स वेगळे असतात. रशिया आणि युक्रेनच्या युद्धा दरम्यान देखील बंकर्सचा उल्लेख झाला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सायबेरियात स्वत: आणि स्वत:च्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी न्युक्लिअर बंकर्स तयार केले आहेत. या बंकरवर अणू हल्ल्याचा देखील परिणाम होत नाही.