ठाकरेंचे फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग, राज्यातील बडे नेतेही..

दिल्लीत संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जवळपास खासदार दिल्लीत आहेत. यादरम्यानच फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यासोबतच राज्यातील काही महत्वाचे नेतेही नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत .

ठाकरेंचे फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग, राज्यातील बडे नेतेही..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Aug 07, 2026 | 9:23 AM

संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएमधील खासदारांसोबत संवाद साधत आहेत. आता फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का होता. आता हे 6 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रेकफास्टचे आयोजन करण्यात आले. ब्रेकफास्ट करत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. ठाकरेंसह TMC चे फुटीर खासदारही मोदींच्या भेटीला पोहोचले. विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट केला.

या फुटीर खासदारांसोबत पार्थ पवारही भेटीसाठी गेलेत. रामदास आठवले यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेतेही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. फुटीर खासदारांसह 43 खासदारांचा मोदींसोबत ब्रेकफास्ट आयोजित करण्यात आले. यादरम्यान बोलताना रामदार आठवले यांनी म्हटले की, ब्रेकफास्टपेक्षा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.

संसद व्यवस्थित चालत नाहीये, विरोधकांकडून हंगामा केला जात आहे. राज्यातील प्रश्नावरही त्यांच्यासोबत चर्चा करू. राज्यातील काही महत्वाचे नेतेही या खासदारांसोबत भेटीला पोहोचले आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आज भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांच्या भेटीला एकनाथ शिंदे पोहोचले होते.

आता थेट पंतप्रधानांची भेट एकनाथ शिंदे घेतील. देशातील जेनझींचे आंदोलन आणि राज्यातील स्थिती यावर एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यावर चर्चा होण्याचा अंदाज आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करून आलेल्या 6 खासदारांपैकी 2 जणांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे सांगितले जातंय. तर श्रीकांत शिंदे यांचा नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us