AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! भीषण दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं…

जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी बिगर-काश्मिरी मजुरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

सर्वात मोठी बातमी! भीषण दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं...
terror attack in kashmir NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 31, 2026 | 10:04 PM
Share

जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी बिगर-काश्मिरी मजुरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू

या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडमधील दीपक यांचा मृत्यू झाला, तर भोपिंदर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला शुक्रवारी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास झाला. हल्ल्यावेळी 3 ते 4 राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत नाकाबंदी केली असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

काश्मीरमध्ये बाहेरील नागरिकांवर अनेकदा हल्ले

31 जुलै 2026 (केल्लम, कुलगाम): दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी दोन बिगर-काश्मिरी मजुरांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

22 एप्रिल 2025 (पहलगाम, अनंतनाग): अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटक आणि बिगर-स्थानिक नागरिकांना लक्ष्य करत भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.

20 ऑक्टोबर 2024 (गगनगीर, गांदरबल): श्रीनगर-लेह महामार्गावरील झेड-मोड बोगदा प्रकल्पाच्या कामगार छावणीवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 6 मजूर आणि 1 डॉक्टर यांचा मृत्यू झाला.

17 एप्रिल 2024 (बिजबेहारा, अनंतनाग): अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा परिसरात बिहारमधील विक्रेता राजा शाह यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

7-8 फेब्रुवारी 2024 (हब्बा कदल, श्रीनगर): श्रीनगरच्या हब्बा कदल भागात पंजाबमधील अमृतसरचे रहिवासी अमृतपाल सिंग आणि रोहित मसीह या दोन बाहेरील मजुरांवर दहशतवाद्यांनी पॉइंट-ब्लँक रेंजमधून गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी