ही वस्तू महिन्यातून फक्त एकदाच जाळा, साप कधीच घरात येणार नाहीत, परिसरात सुद्धा दिसत नाहीत

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. विशेषत: पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अनेकदा साप घरात देखील घुसतात. साप घरात शिरू नये यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं असतं.

ही वस्तू महिन्यातून फक्त एकदाच जाळा, साप कधीच घरात येणार नाहीत, परिसरात सुद्धा दिसत नाहीत
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 5:20 PM

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैर समज असतात. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, हा त्यातील सर्वात मोठा गैरसमज आहे. परंतु भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, त्यातील अगदी हातच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग अशा काही प्रजातीच्या सापांचा समावेश होतो. मात्र साप कोणत्याही प्रजातीचा असो, योग्य ती काळजी घेतली गेलीच पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी साप आढळून आला तर त्याला मारू नका, किंवा त्याला पकडू देखील नका. कारण साप विषारी आहे की बिनविषारी हे तुम्हाला माहिती नसल्यामुळे ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. त्याची माहिती तुम्ही तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना देऊ शकतात, ते सापांना सुरक्षितरित्या रेस्क्यू  करतील.

सापांना नेहमी आर्द्रता युक्त वातावरण आवडतं, जिथे आर्द्रता जास्त आहे, अशाच ठिकाणी अनेकदा साप वास्तव्य करतात. त्यामुळे तुमच्या घरातही अशा काही जागा असतील तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. साप घरात घुसू नये, तसेच घरात कुठे साप लपला असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी आजही ग्रामीण भागांमध्ये काही पारंपरीक उपाय केले जातात.

Loading...

ग्रामीण भागांमध्ये जेव्हा एखाद्या बैलाचा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो. तेव्हा त्याचं शिंग हे व्यवस्थितरित्या जपून ठेवलं जातं. ज्या घरात साप निघाला आहे, अशा घरामध्ये हे शिंग जाळलं जातं. या शिंगाला उग्र असा वास असतो. यामुळे साप घराजवळ येत नाही, तसेच समजा घरात एखादा साप लपला असेल तर तो देखील दूर निघून जातो. आजही ग्रामीम भागांमध्ये हा उपाय मोठ्या प्रमाणात केला जातो.  तसेच दुर्गम भागांमध्ये पाड्यावर राहणारे आदिवासी लोक देखील हा उपाय करतात.  यासोबतच साप घरात येऊ नये, यासाठी घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे, गवत वाढू न देणे, घरात कुठेही अडचणी होणार नाही, याची काळजी घेणे असे विविध उपाय आपल्याला करता येतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us