Bypoll Results : 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार, कोण उधळणार विजयाचा गुलाल?
देशातील 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. आता या जागांवर विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची अपडेट थोड्या वेळात समोर येणार आहे.

देशातील विविध भागांमधील 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज 9 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यात आज 5 विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर एका लोकसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीचा जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम, रेजीनगर, तामिळनाडू, मदुरंतकम, धारापुरम, पुडुचेरीच्या थट्टनचावडी आणि आसामच्या नगांव लोकसभेच्या जागेवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होईल. या जागांवरील मतमोजणीला थोड्यात वेळात सुरुवात केली जाणार आहे. या पोटनिवणुकीसाठी 6 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं. संपूर्ण देशाचं पोटनिवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुडुच्चेरी आणि आसाममधील एकूण सहा जागांवर मतदान होणार आहे.पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगरवर मतदान झालं होतं. यातील नंदीग्रामच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या पोटनिवणुकीचा निकाल महत्वाचा मानला जात आहे. आसामच्या नगांव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या एकमेव लोकसभेच्या पोटनिवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.
मजमोजणीनंतर सुरूवातीचे कल समजीतील
तामिळनाडूच्या मदुरंतकम आणि धारापुरम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या दोन्ही जागा राखीव आहेत .पुडुचेरीचा थट्टनचावडी विधानसभा मतदारसंघाचा निकालाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या तीन जागांवरील निकाल देखील महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. या सर्व पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एक लोकसभा सोडली तर बाकी सर्व विधानसभा मतदारसंघ आहेत. 6 जागांवरील मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा कल देखील समजतील. यामुळे कोणता उमेदवार आघाडीवर आहे, तर कोण पिछाडीवर आहे, हे समजेल. तर कोणत्या जागेवर कोणाचा पराभव झाला, हे देखील काही वेळेत स्पष्ट होईल. नंदीग्राम ते नगांवर कोणाचा वर्चस्व कायम असणार, तर कोणाला झटका बसणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पश्चिम बंगालच्या 2,तामिळनाडूच्या 2 , पुडुचेरीच्या एक आणि आसामच्या एक जागांवरील निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा मानला जाणार आहे. सर्व जागांवरील निकाल त्या त्या राज्यांसाठी देखील महत्त्वाचे असणार आहेत.