High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?

High Court : ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटवरुन या जोडप्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यावेळी पती काळा वर्ण, लाजरा स्वभाव, कमी IQ आणि बोलण्याच्या पद्धतीवरुन वरुन सतत टोमणे मारायचा.

High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Husband-Wife
| Updated on: Aug 25, 2026 | 5:20 PM

एखाद्याच्या वर्णावरुन बोलणं चुकीचच आहे, तरीही काही जण चिडवाचिडवी मध्ये समोरच्याला त्याच्या वर्णावरुन बोलतात. वर्णावरुन होणाऱ्या या चिडवाचिडवीमध्ये प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो. खासकरुन पती-पत्नीच्या नात्यात आदर खूप महत्वाचा असतो, तरीही काहीजण पत्नीला अपमानित करण्याच्या उद्देशाने, कमीपणा दाखवण्यासाठी तिच्या वर्णावरुन टिप्पणी करतात. झारखंड उच्च न्यायालयात असच एक प्रकरण आलं आहे. त्यात काळ्या वर्णावरुन पती आपल्याला हिणवतो असा पत्नीने आरोप केला आहे. नवरा मला काळा रंग आणि कॉमन सेन्सवरुन सतत टोमणे मारत असतो. ही एकप्रकारची क्रूरता आहे, असा तिने आरोप केलाय. या प्रकरणात निकाल देताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केलय की, पत्नीचा काळा रंग, कमी IQ किंवा खराब कम्युनिकेशन स्कील्स हे भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ अंतर्गत गुन्हेगारी क्रूरतेच्या कक्षेत येत नाही.

रांचीच्या सत्र न्यायालयाने पती विरुद्ध समन आदेश आणि 498A कार्यवाहीचा आदेश दिलेला. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल कुमार चौधरी यांच्या बेंचने याचिका क्रमांक 484/2025 सुनावणी करताना हा आदेश रद्द केला. कोर्टाने म्हटलं की, सर्व आरोप जरी खरे मानले तरी कलम 498 ए अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

म्हणून त्याने पत्नीला घर सोडायला सांगितलं

ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटवरुन या जोडप्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यावेळी पती काळा वर्ण, लाजरा स्वभाव, कमी IQ आणि बोलण्याच्या पद्धतीवरुन वरुन सतत टोमणे मारायचा. पत्नीमुळे मला एक आजार झाला असून त्यामुळे मी पीडित आहे, असा पतीचा दावा होता. म्हणून त्याने पत्नीला घर सोडायला सांगितलं. म्हणून पत्नी आधी बंगळुरुत छोट्या बहिणीकडे आणि कोलकातामध्ये मोठ्या बहिणीकडे रहायला गेली.

नवऱ्याने त्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं

पतीने रांचीच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्नीने रांचीच्या न्यायालयात पती विरुद्ध 498A आणि स्त्रीधन गुन्हेगारी प्रकरण नोंदवलं. 11 जून 2024 रोजी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने पतीला समन जारी केलं. नवऱ्याने त्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं.

 

Follow Us