मोठी बातमी! वर्षातून 2 वेळा होणार 10 वीची बोर्ड परीक्षा

सीबीएससी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाअंतर्गत इयत्ता दहावीसाठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे.

मोठी बातमी! वर्षातून 2 वेळा होणार 10 वीची बोर्ड परीक्षा
10 class cbse exam
| Updated on: Jun 25, 2025 | 5:07 PM

CBSE 10 th Class Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा चालू होती. मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे. या निर्णयानंतर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे.

फेब्रुवारी, मे महिन्यात होणार परीक्षा

सीबीएसईने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 सालापासून लागू होणार आहे. फेब्रुवारी आणि मे दोन महिन्यांत इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे.

परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार?

सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं परीक्षेचं ओझं कमी व्हावं त्यामुळे हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.

वर्षातून एकदाच होणार मूल्यांकन

या निर्णयाअंतर्गत दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच मूल्यांकन मात्र वर्षात एकदाच होणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयाची थेट अंमलबजावणी होणार नाही. अगोदर सीबीएसई याबाबतचे नियम तयार करेल. त्यानंतर हे नियम जनतेच्या पुढे मांडण्यात येतील. लोकांच्या सूचनांना लक्षात घेऊन नंतरच या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार?

दरम्यान, सीबीएसईने हा निर्णय घेतला असला तरी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची यावर काय भूमिका असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही या निर्णयाबाबत काय सूर असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार? विद्यार्थी, पालकांना याबबत कसे समजावून सांगितले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.