CDS Bipin Rawat : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, सीडीएस रावत गंभीर जखमी

| Updated on: Dec 08, 2021 | 3:33 PM

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11वर गेला आहे तर सीडीएस बिपिन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

CDS Bipin Rawat : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, सीडीएस रावत गंभीर जखमी
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या अपघातात 4 जणांचे मृतदेह हाती आले आहेत.
Follow us on

तामिळनाडू : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11वर गेला आहे तर सीडीएस बिपिन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत माहिती देणार असून त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे देशभरातील हलचाली आता वाढल्या आहेत. याप्रकरणात प्रत्येक क्षणी मोठी अपडेट समोर येत आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन घटनास्थळी जाणार

तर डिजीपींना तातडीने घटनास्थळी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत.

वायुसेनाप्रमुख घटनास्थळी रवाना 

हेलिकॉप्टर अपघाताच्या पाहणीसाठी वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी घटनास्थळी जाणार आहेत. ते रुग्णायातही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायुसेनाप्रमुख अपघातस्थळी जाऊन अपघात कसा झाला याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे.

चौकशीचे आदेश

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. मात्र, यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.

सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे, केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय

Latur Murder | जन्मदात्रीकडून दोन वर्षांच्या मुलाची विहिरीत फेकून हत्या, लातूरमध्ये धक्कादायक घटना

Congress Manifesto: स्त्रियांना सरकारी नोकरीत 40 टक्के आरक्षण देणार; प्रियंका गांधींकडून यूपीचा ‘अजेंडा’ जाहीर