AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CDS Final Result 2020: यूपीएससीकडून सीडीएस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 147 उमेदवारांची निवड

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. CDS Examination Final Result

CDS Final Result 2020: यूपीएससीकडून सीडीएस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 147 उमेदवारांची निवड
UPSC
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 24, 2021 | 7:09 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 147 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं लेखी परीक्षा आणि मुलाखत घेल्यानंतर हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांची मुलाखत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई आणि इतर ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एकूण 147 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. ( CDS Examination I 2020 final result declared by upsc check result at upsc gov in )

147 उमेदवारांची निवड

केंद्रीय लोकसेवा आयोगानं संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये 147 उमेदवारांची निवड केल्याचं घोषित केलं आहे.यूपीएससीकडून लेखी परीक्षा घेण्यात आल्यानंतर या उमेदवारांची मुलाखत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या पॅनेलनं घेतली होती.

निकालाविषयी माहिती कुठे मिळणार?

सीडीएस परीक्षा 2020 दिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. हा निकाल 30 दिवस उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचं गूणपत्रक देखील पाहता येणार आहे.

UPSC CDS Final Result 2020 निकाल असा पाहा

स्टेप1: निकाल पाहण्यासाठी यूपीएसईच्या ऑफिशियल वेबसाईट वर भेट द्या स्टेप 2: वेबसाईट वरील What’s New वर क्लिक करा स्टेप 3: इथे Final Result: Combined Defence Services Examination (I), 2020 (OTA) वर क्लिक करा स्टेप 4: आता Final Result वर क्लिक करा, तिथे Documents दिलेल्या लिंकवर क्लिक करा स्टेप 5: आता पीडीएफ डाऊनलोड होईल त्यामध्ये तुमचा परीक्षा क्रमांक पाहा.

निवड झालेल्या उमेदवारांना ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई, इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून, नावल अकॅडमी, केरळ, एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद येथे प्रशिक्षणसाठी पाठवलं जाईल.

संबंधित बातम्या:  

MHA Recruitment 2021: गृह मंत्रालयात लॉ ऑफिसर आणि अकाउंट्स ऑफिसरसह अन्य पदांवर भरती, आजच अर्ज करा

SBI Clerk Recruitment : स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, 49 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची संधी चुकवू नका

IIFT Recruitment 2021: सहाय्यक प्राध्यापकांसह अनेक पदांवर निघाली भरती, 2 लाखांपर्यंत मिळणार पगार

( CDS Examination I 2020 final result declared by upsc check result at upsc gov in )

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...