केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट सर्वसामान्यांना दणका, कांदे खरेदीवर तब्बल..

Onion Procurement : नुकताच केंद्र सरकारने कांद्याबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला. थेट यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या बजेटवर होणार.

केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट सर्वसामान्यांना दणका, कांदे खरेदीवर तब्बल..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Jul 05, 2026 | 7:54 AM

Onion Price : केंद्र सरकारने कांद्याबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या भावावर होणार आहे. कांद्याचा वापर दररोजच्या जेवणात होतो. याच कांद्याकरिता आता लोकांना अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि गरजेच्या वेळी बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी, याकरिता केंद्र सरकारने थेट बफर स्टॉकसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचा खरेदी दर वाढवला आहे, याबाबत थेट निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे आता कांद्याच्या भावात थेट मोठी वाढ होईल. 13 टक्क्यांनी खरेदी वाढली आहे. बफर स्टॉकसाठी कांद्याची खरेदी शेतकऱ्यांकडून 2,125 रुपये दराने केली जाईल. हा नवीन दर कालपासूनच लागू करण्यात आला. सरकारी संस्थांना फक्त 2000 टन कांद्याची खरेदी करता आली आहे. चालू हंगामात बफर स्टॉकसाठीच्या कांद्याच्या खरेदी दरात सरकारने वाढ करण्याची ही पाचवी वेळ आहे. ज्यामुळे याचा थेट परिणाम लोकांच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे.

केंद्र सरकारचा हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की, शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला भाव मिळावा. मात्र, हा सर्वसामान्य लोकांकरिता नक्की दणका आहे. 2026-26 मध्ये देशातील कांद्याचे उत्पादन 307.37 लाख होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीही इतकेच उत्पादन झाले होते.

कोणताही प्रकारचा देशात कांद्याचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातून 30,000 टनांहून अधिक कांदा येत आहे. घाऊक बाजारात याचा सरासरी दर प्रति किलो सुमारे 18 रुपये आहे. किरकोळ बाजारात दर प्रति किलो सुमारे 31 रुपये आहे. सरकारच्या अंदाजानुसार, देशात यावेळी उत्पादन 307.37 लाख टन होऊ शकते. तसा अंदाज आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते. त्यामध्येच कांदा एक असा आहे की, स्वयंपाक घरात दररोजच लागतो. काही लोकांची कांद्याशिवाय भाजीच पूर्ण होत नाही. इराण आणि अमेरिका युद्धात देशात महागाई चांगलीच वाढताना दिसली. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले आहे. पण महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

Follow Us