कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डी विमानतळाचे नामांतर होणार?; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

| Updated on: Jan 31, 2021 | 11:13 AM

महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद आणि शिर्डी या तिन्ही विमानतळांचे नामांतर होण्याची दाट शक्यता आहे. (central government will change 13 airport name including in maharashtra)

कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डी विमानतळाचे नामांतर होणार?; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद आणि शिर्डी या तिन्ही विमानतळांचे नामांतर होण्याची दाट शक्यता आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने तसा प्रस्तावच केंद्र सरकारला दिला असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर, कोल्हापूर विमानतळाचं नामांतर ‘छत्रपती राजाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करण्यास केंद्र सरकारने अनुकूलता दर्शविल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (central government will change 13 airport name including in maharashtra)

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डीसह देशातील 13 विमानतळांच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यातील काही प्रस्तावांवर केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. तर ज्या नावांवर वाद आहेत, अशा विमानतळांचे प्रस्ताव वेटिंगवर ठेवल्याचं समजतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे प्रस्ताव ठेवण्यात येणार असून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याचं निश्चित झालं असून त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

सुरेश प्रभूंनी केली होती घोषणा

दरम्यान, फेब्रुवारी 2019मध्ये तत्कालीन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू हे कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्यावतीने कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यात येत असल्याचं जाहीर करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. त्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत या नामांतरावर निर्णय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिर्डी विमानतळाला साईबाबांचे नाव

शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला साईबाबांचे नाव देण्यात येणार आहे. श्री साईबाबा संस्थानाने विमानतळाच्या नामांतराचा ठराव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला होता. या विमानतळाचे ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याचा हा ठराव होता. 2017 रोजी राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे शिर्डी विमानतळाच्या नामांतराचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव

मार्च 2020 मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा निर्णय घेतला होता. तसं ट्विटही राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलं होतं. (central government will change 13 airport name including in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

राधाकृष्ण विखे पाटलांच्या ह्या फोटोची महाराष्ट्रभर चर्चा का?

राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गर्दी; कामाची पद्धत कशी?

(central government will change 13 airport name including in maharashtra)