
इराण यु्द्धामुळे जगातील अनेक देशात तेल संकट निर्माण झालं आहे. तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. या ऊर्जा संकटादरम्यान पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दोन पोस्ट केल्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलय की, देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजीची कुठलीही कमतरता नाहीय. जागतिक स्थितीमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि आवश्यक वस्तुंशी संबंधित स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असं हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. देशात इंधन, ऊर्जा आणि अन्य वस्तुंचा पुरवठा कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरळीत सुरु रहावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलय. संभाव्य सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं त्यांनी लिहिलय.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी लॉकडाऊनच्या मुद्यावर सुद्धा बोलले. लॉकडाऊनवरुन पसरणाऱ्या अफवा पूर्णपणे चुकीच्या असल्याचं ते म्हणाले. लॉकडाऊन संदर्भात सरकारच्या स्तरावर कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अशा प्रसंगी आपण सर्व शांत, जबाबदार आणि एकजूट असलं पाहिजे. अशा परिस्थितीत अफवा पसरवणं आणि विनाकारण भितीचं वातावरण बनवणं बेजबाबदार आणि हानिकारक असं आहे असं ते म्हणाले.
The global situation remains in flux, and we are closely monitoring developments across energy, supply chains, and essential commodities on a real-time basis.
Under the leadership of Hon’ble PM @narendramodi Ji, all necessary steps are being taken to ensure uninterrupted…
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
प्रति तेल पिंप दर काय?
एका अन्य पोस्टमध्ये हरदीप सिंह पुरी यांनी मागच्या महिन्याभरातील वाढत्या तेल किंमतीचा दाखला दिला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती 70 डॉलर प्रति बॅरलवरुन 122 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे अनेक देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
दक्षिण-पूर्वी आशियाई देशात पेट्रोल-डिझेलचे दर 30 ते 50 टक्के वाढले आहेत. आफ्रिकी देशांमध्ये 50 टक्के मोठी वाढ दिसून आलेली आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये 20 ते 30 टक्के दर वाढले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढूनही भारतात दर वाढलेले नाहीत याकडे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लक्ष वेधलं.
International crude prices have gone through the roof in the last 1 month from around 70 dollars/barrel to around 122 dollars/barrel. Consequently, petrol and diesel prices for consumers have gone up all over the world. Prices have increased by around 30%-50% in South East Asian…
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
सरकारने एक्साइज ड्युटी का कमी केली?
तेल कंपन्यांना मोठं नुकसान होत आहे. ते कमी करण्यासाठी सरकारने टॅक्स रेवेन्यूमध्ये मोठी कपात केली आहे. शुक्रवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 10 रुपये प्रती लिटर एक्साइज ड्युटी कमी केली. पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी कमी होऊन आता 13 वरुन 3 रुपयांवर आली आहे. डीझेलवरील एक्साइज ड्युटी शून्य झाली आहे.