AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown 2.0 fears: इराण युद्धामुळे इंधन संकट? आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचा तो मोठा दावा, जग टाळेबंदीच्या उंबरठ्यावर?

Lockdown 2 fears due to Fuel crisis: अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जगावर इंधन संकट घोंगावत असल्याची चर्चा होत असतानाच आता आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने मोठा दावा केला आहे. त्यामुळे जग दुसऱ्या टाळेबंदीच्या उंबरठ्यावर असल्याच्या वार्तांना ऊत आला आहे. काय आहे त्यामागील सत्य?

Lockdown 2.0 fears: इराण युद्धामुळे इंधन संकट? आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचा तो मोठा दावा, जग टाळेबंदीच्या उंबरठ्यावर?
टाळेबंदी २ चा अवतार?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 10:19 AM
Share

International Energy Agency: अमेरिका आणि इस्त्रायलने इराण युद्धाच्या आडून जगावर इंधन संकट लादल्याचा वाद ऑनलाईन पेटला आहे. जग इंधन संकटाच्या चौकटीवर असल्याचा दावा सुरू आहे. जगातील अनेक देशांमध्ये इंधन संकटाच्या झळ बसत आहेत. मध्य-पूर्वेतील युद्धाने जागतिक ऊर्जा बाजारावर मोठे संकट आणले आहे. जागतिक संस्थांनी इंधन पुरवठ्यावरील निर्बंधाची तुलना मागील काही बंदीच्या नियमांशी केली आहे. त्यामुळे जगात इंधन संकट गहिरे होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याविषयीचे एक वृत्त इकोनॉमिक टाईम्सने जागतिक ऊर्जा संघटनेच्या आधारे दिले आहे. काय आहे सत्यता?

जागतिक ऊर्जा संघटनेच्या आपत्कालीन शिफारसी

द इकोनॉमिक टाईम्सने एक वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात द डेली स्टार या वृत्तपत्रातील बातमीचा दाखल देत, मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण आल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने संभाव्य संकटासाठी जगातील देशांना आपत्कालीन शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींचा एक संच IEA ने देशांना पाठवला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

जागतिक ऊर्जा संघटनेच्या शिफारसी काय?

जागतिक ऊर्जा संघटनेने Sheltering From Oil Shocks या नावाने म्हणजे तेलाच्या धक्क्यापासून बचावाचे उपाय या नावाने शिफारस अहवाल पाठवला आहे. त्यात इंधनाची टंचाई अधिक गंभीर झाल्यास इंधनाचा वापर कमी करण्यासाठी दहा उपयायोजना सुचवण्यात आल्या आहेत. त्यात वाहतूक क्षेत्रातील वाहनांचा वापर कमी करण्यावर जोर देण्यात आला आहे. इंधन वापर कमी करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

पुन्हा वर्क फ्रॉम होम?

International Energy Agency ने एक महत्त्वाची शिफारस केली आहे. त्यात शक्य असेल तर घरून काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर महामार्गांवरील वेग मर्यादा ही ताशी 10 किमीने कमी करण्याची शिफारस आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचाही या शिफारसींमध्ये समावेश आहे. कार-शेअररिंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर, जुन्या वाहनांऐवजी कार्यक्षम वाहनांचा वापर, हवाई प्रवासांवर मर्यादा तर इतर पर्याय शोधण्याची शिफारस करण्यात आली आहे.

खरंच टाळेबंदी 2 ?

या शिफारसी समोर येताच समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोविड-19 महामारीत लोक जणू घरातच जायबंदी झाले होते. त्यांना बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करावे लागत होते. अवघे जग जणू थांबले होते. पण आता या नवीन संकटावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपण या दुसर्‍या टाळेबंदीसाठी, Lockdown 2.0 आवृत्तीसाठी तयार नसल्याचे म्हटले आहे. अर्थात केंद्र सरकारने देशात इंधन संकट नसल्याचे आणि पुरेसा इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया सुरूच आहेत.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं