AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Pump Que: पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, जिल्हाधिकारी म्हणतात, ‘अफवांवर विश्वास ठेऊ नका’ इंधनाचा पुरेसा साठा

Buldhana Collector Appeal Not to Worry about Petrol: पेट्रोल डिझेलचा पुरवठा होत नसल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपापैकी बहुतांश पंप इंधन उपलब्धते आभावी बंद आहेत. तर जिथं पेट्रोल उपलब्ध आहे, त्या पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर प्रशासानाने मोठे आवाहन केले आहे.

Petrol Pump Que: पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, जिल्हाधिकारी म्हणतात, 'अफवांवर विश्वास ठेऊ नका' इंधनाचा पुरेसा साठा
अफवांवर विश्वास ठेऊ नकाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 9:25 AM
Share

Buldhana Petrol Pump Que: बुलढाणा जिल्ह्यात सध्या पेट्रोल, डिझेलच्या उपलब्धतेवरून अनेक पंपावर तणावपूर्ण वातावरण आहे.अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 166 पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी अनेक पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपावर सध्या इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालक सकाळपासूनच रांगेत उभे राहत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडत आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मोठे आवाहन केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

एकीकडे इंधन तुटवडा जाणवत असल्याने पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. “अफवांवर विश्वास ठेवू नका, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र शहरीसह ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने हाहाकार उडाला आहे.

प्लास्टिक डब्बे घेऊन ग्राहकांची पेट्रोल पंपावर गर्दी

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेल ही घेऊन गेला. तर इतर ही ग्राहक पंपावर मिळेल ती प्लास्टिक डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले. दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. आता प्रशासना काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंप आऊट ऑफ स्टॉक

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावर ऑऊट ऑफ स्टॉकचे बोर्ड झळकायला सुरुवात झाली आहे. तर जिथे पेट्रोल उपलब्ध आहे, त्या पंपावर दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहनात पेट्रोल – डिझेल भरून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंपावर मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांची झुंबड उडाली आहे. बंद असलेल्या पेट्रोल पंपावर सकाळी 5 वाजल्यापासून रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंप चालू करण्यापूर्वीच अनेक पेट्रोल पंपावरून लाऊड स्पीकर मधून ग्राहकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तर रांगेवरून ग्राहकांमध्ये वाद होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर