AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel: दुचाकीसाठी 200 तर चारचाकींसाठी 2 हजारांचे पेट्रोल; जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश, त्या अफवेने राज्यात पेट्रोल पंपावर रांगा

Petrol-Diesel: राज्यातील अनेक शहरात इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे पेट्रोलपंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अफवा पसरल्याने निर्माण झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहे. नागरिकांना कॅन बाटल्या किंवा ड्रम मध्ये इंधन देण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. राज्यातील शहरात पेट्रोल पंपावर काय आहे स्थिती?

Petrol-Diesel: दुचाकीसाठी 200 तर चारचाकींसाठी 2 हजारांचे पेट्रोल; जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश, त्या अफवेने राज्यात पेट्रोल पंपावर रांगा
पेट्रोल-डिझेलसाठी लांबच लांब रांगाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 26, 2026 | 8:42 AM
Share

Petrol-Diesel: पेट्रोल आणि डिझेल संपणार अशी अफवा पसरताच नागरिक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी करत आहे मात्र जालन्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहे. त्यानुसार दुचाकी साठी 200 तर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2 हजार रुपयांचं पेट्रोल मिळणार असल्याचं आदेशात म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असताना देखील नागरिकांमध्ये पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. पेट्रोल पंपावर लांब रांगा लागत आहे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हे निर्बंध लावण्यात आले आहे, शिवाय प्रत्येक पंप धारकांना उपलब्ध साठा, मागणी केलेला आणि प्राप्त साठा याची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.

पहाटेपासून अचानक वाढली गर्दी

नाशिकमधील पेट्रोल पंपावर वर पहाटे पासून अचानक गर्दी वाढली. मर्यादीत पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेने नागरिकांची पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी दिसून येत आहे. सुरळीत सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढल्याने पंप चालकांची तारांबळ उडाली. अनेक पंपांवर पेट्रोलच संपल्याने गोंधळाची परिस्थिती दिसून आली. नाशिक शहरातील सगळ्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तातडीने जास्तीचे टँकर नाशिक मध्ये पाठवण्याची पेट्रोल पंप असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. पहाटेपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहे.

नंदुरबारमध्ये नागरिकांना अडचणींचा सामना

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला आहे. नंदुरबार जिल्ह्या लागत असलेला गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. नायरा कंपनीच्या अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या वीस दिवसांपासून इंधन उपलब्ध नाही. मागणी करूनही तब्बल पंधरा दिवसांनीच टँकर मिळत असल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गुजरात प्रशासनाने बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे. वाहनांना मर्यादित प्रमाणातच इंधन देण्याचे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधन पुरवठा कधी सुरळीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

छत्रपती संभाजीनगर मध्ये बंद असलेल्या पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर रांगा लागल्याचे चित्र आहे. शहरातील क्रांतीचौकात असलेल्या HP च्या पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनाच्या रांगा आता रस्त्यावर आल्या आहेत. रस्त्यावर वाहनाच्या रांगा आल्याने क्रांती चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

अमरावतीत लांबच लांब रांगा

अमरावती शहरात रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंप वर पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसली. पेट्रोल संपणार या अफवेने केली नागरिकानी मोठी गर्दी दिसून आली. इर्विन चौकातील पेट्रोल पंप वरील पेट्रोल संपले. सध्या राज्यात पेट्रोल पंपावर इंधन संपल्याच्या अफवेने नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचा परिणाम अमरावतीतही दिसून आला.

पोलिसांच्या कडक पहाऱ्यात पेट्रोल डिझेलचे वाटप सुरु

पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण आहे अशी अफ़वा पसरल्यामुळे नांदेडच्या बारड येथील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. 20 – 20 लिटरच्या कॅन घेऊन वाहनधारक पेट्रोल पंपावर दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पेट्रोल डिझेलचा कुठलाही नसल्याचे स्पष्ट केल असून पेट्रोल डिझेल संपणार ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केला आहे. त्यानंतर ही गर्दी कमी होत नसल्याने पेट्रोल पंपावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पेट्रोल पंपावर कडक पहारा सुरू केला आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत