कोरोना विषाणूत 17 वेळा बदल, नव्या स्ट्रेनविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काय सांगितलं?

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लसींवर परिणाम होणार नाही, त्यामुळे घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. (Central Health Ministry Press)

कोरोना विषाणूत  17 वेळा बदल, नव्या स्ट्रेनविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काय सांगितलं?

नवी दिल्ली: यूकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. कोरोना विषाणूमध्ये आतापर्यंत 17 वेळा बदल झाले आहेत. विषाणूमध्ये म्यूटेशन होत असते. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांशी बोलल्यानंतर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळं बाधित असलेल्या व्यक्तींची प्रकृती गंभीर झाल्याची उदाहरण कमी आहेत. विषाणूच्या नव्या म्यूटेशनमळे मृत्यूदरही वाढलेले नाहीत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लसींवर परिणाम होणार नाही,  त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.  (Central Health Ministry Press on New Coronavirus Strain)

आपल्या देशात चांगल्या प्रयोगशाळांची व्यवस्था आहे. प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये असा विषाणू आढळला नाही. प्रयोगशाळांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. आतापर्यंत अशा प्रकारची लक्षणं दिसून आली नाहीत. भारतातील प्रयोगशाळांनी यापूर्वी हजारो जिनोम सिक्वेंन्सिंग केले आहे, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेय.

नव्या कोरोना स्ट्रेनविषयी माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं यूकेमधून येणारी विमानसेवा तातडीनं खंडित केली आहे. प्रयोगशाळेत विषाणूचे नमुने आले आहेत त्यांचे जिनोमिक सिस्टीमेशन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यूरोपमधून भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. त्यांना काही आजार झाले आहेत का, याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे.

25 नोव्हेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्यांना मिळणार

भारतात यूरोपातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांच्यावर उपचार केले जातील. ज्यांची निगेटिव्ह येईल त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान यूरोप आणि यूकेमधून भारतात आले आहेत. याबाबत माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. (Central Health Ministry Press on New Coronavirus Strain)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोनाच्या परिस्थितीचा अभ्यास केला असता घाबरुन न जाता सतर्क राहणं गरजेचे आहे. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी विषाणूची चैन तोडणं गरजेचे आहे. कोरोनाबद्दल नवं आव्हान कोणत्याही देशासमोर आलं असलं तरी आपल्याला सतर्क राहणं गरजेचे आहे, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोनाच्या नव्या म्युटेशनमुळे कोरोना लसींवर कोणताही परिणाम होणार नाही. नव्या स्ट्रेनमुळं नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. नव्या स्ट्रेनमुळं संसर्गाचा वेग वाढत आहे. मात्र, मृत्यूंचं प्रमाण वाढलं नाही. भारतात 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10 हजार पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना रुग्णसंख्येपैकी 57 टक्के रुग्ण 6 राज्यांमध्ये आहेत.

भारत सरकारकडे फायझर,सीरम आणि भारत बायोटेक यांचे लसीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज आले आहेत. मात्र, फायझरने अद्याप लसीबाबत डाटा दिलेला नाही. तर, एका कंपनीनं डाटा दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

(Central Health Ministry Press on New Coronavirus Strain)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI