बाप्पा पावला! गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

| Updated on: Jul 14, 2021 | 4:58 PM

गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. (Central Railway to run 72 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

बाप्पा पावला! गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
Follow us on

नवी दिल्ली: गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणाच नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. (Central Railway to run 72 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. गणेशोत्सव काळात CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल या गाडीच्या एकूण 36 ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या 10 ट्रिप होणार आहेत. पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण 10 ट्रीप होणार आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

पंतप्रधानांचे आदेश

आपण प्रत्येकाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहीजे. 72 गाड्या सोडूनही जर वेटींग असेल. प्रवासाची अडचण होत असेल तर रेल्वे मंत्रालयाने अधिक गाड्या सोडण्याचे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

शेलारांचं निवेदन

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवासाठी अधिक गाड्या सोडण्याची मागणी केली होती. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. (Central Railway to run 72 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

 

संबंधित बातम्या:

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

संघ इतका का बदलतोय? त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे: संजय राऊत

(Central Railway to run 72 Ganpati special trains between Mumbai and Konkan)