कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे
ashish shelar

कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी नवे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केली आहे. ( Ganeshotsav 2021)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 11, 2021 | 10:24 AM

पुणे: कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी नवे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (ashish shelar demand raosaheb danve to run extra trains for konkan to ganesh festival)

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन ही मागणी केली. गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वे ने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली. तसेच बुकिंग सुरू होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत, याकडे शेलार यांनी नव्या रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधले.

इतर सुविधाही द्या

दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.

बुकींग सुरू

कोकणातील गणेशोत्सव हा परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. 8 जुलैपासून या गाड्यांचे बुकींग सुरू झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

72 गणपती स्पेशल ट्रेन

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाडय़ांचे बुकिंग गुरुवार 8 जुलैला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाले आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. यात कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहे. (ashish shelar demand raosaheb danve to run extra trains for konkan to ganesh festival)

संबंधित बातम्या:

Ganeshotsav 2021 | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या, 8 जुलैपासून बुकिंग

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

रत्नागिरीत लॉकडाऊन अयशस्वी, पॉझिटिव्हीटी दरात दुसऱ्या स्थानी, मृत्यूदरामुळं टेन्शन वाढलं

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील

(ashish shelar demand raosaheb danve to run extra trains for konkan to ganesh festival)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें