गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील

गणेशोत्सवानिमित्त मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत याविषयी घोषणा केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “यावेळी पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र, तरीही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी, रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू आहे. ते तात्काळ पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर मुंबई-कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांना टोल माफ करण्यात येईल.”

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डायव्हर्जन बोर्ड, रोड स्ट्रीप्स, अपघाताबाबत सावध करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्यात आले आहेत. याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील 143 किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. 208 किमीचे रस्ते सुस्थितीत असून 14.60 किमीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तेही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. सायन-पनवेल, खारपाडा, इंदापूर अशा विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ दुरूस्ती अनेक ठिकाणी सुरू आहे. तसेच पुलावरही दुरूस्तीचे काम सुरू आहे. गणपतीपूर्वी सर्व रस्ते सुरळीत होतील, असंही पाटील यांनी म्हटलं.

सोमवारी (26 ऑगस्ट) मंत्रालयात गणेशोत्सवापूर्वी ट्रॅफिक नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्यासह उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव सगणे आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *