
शेकडो सालापासून भारतीय गावे त्यांच्या साधेपणासाठी आणि परंपरासाठी ओळखले जातात. परंतू काळ आता बदलत आहे. सोयी आणि सुविधा वाढल्या आहेत. परंतू आजही काही गावात तेथील अनोख्या परंपरांकडे सर्वांचे लक्ष आकर्षित करतात. असे एक गाव गुजरात येथेही आहे. परंतू या गावातील कोणत्याही घरात चुल नाही. तरीही सर्वजण एकत्र बसून जेवतात आणि कोणीही उपाशी राहत नाहीत.
या गावाचे नाव चंदंकी असे आहे. सुमारे १००० लोकसंख्येच्या या गावात सामुदायिक स्वयंपाकघराची अनोखी परंपरा चालत आली आहे. या संपूर्ण गावात जेवण रोज एकाच जागी तयार केले जाते. आणि सर्व गावकरी एकत्र येऊन जेवतात. ही व्यवस्था केवळ जेवणापर्यंत मर्यादित नाही. तर गावच्या एकता आणि सामाजिक सद्भावाचे एक प्रतिक आहे.
गावातील एक बुजुर्गाने सांगितले की अनेक वर्षांपूर्वी जेव्हा गावातील तरुण नोकरी आणि पोटा पाण्याच्या निमित्ताने शहरात आणि परदेशात जाऊन राहू लागले. तेव्हा गावाती म्हाताऱ्या लोकांनी संख्या वाढली. यामुळे एकत्र येऊन जेवण तयार करणे आणि एकत्र पंगतीला बसणे सुरु झाले. बऱ्याच काळानंतर ही परंपरा कायम सुरुच ठेवण्यात आली आहे. आज ही या गावाची ओळख बनली आहे. आज सुमारे १०० गाववाले रोज जेवण शिजवण्याची जबाबदारी स्वत: वाटून घेतात.त्यामुळे कोणावर ओझं पडत नाही. डाळ, भाज्या, चपात्या सर्वजण एकत्र येऊन तयार करतात. तसेच सणासुदीला आणि खास निमित्ताने वेग-वेगळी पंच पक्वाने देखील तयार केली जातात.
चंदंकीचे सामुहिक किचन आता पर्यटकांसाठी देखील एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे येणारे पाहुणे केवळ जेवणाचा आनंदच घेत नाही तर गावातील संस्कृती , एकता आणि एकजूटीचाही अनुभव देखील घेतात. चंदंकी गावातील लोक मानतात की येथे कोणी एकटे नाही. एकमेकांच्या सुख आणि दु:खात साथ देण्याची परंपरा या संपूर्ण गावाने पाळत गावालाच एक कुटुंबात बांधले आहे.