
छत्तीसगडमध्ये दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने आज सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचा मुलाच्या घरी तसेच कार्यालयावर छापेमारी केली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. ईडीचे अधिकारी छापेमारी करून निघाले असतानाच त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. ईडी अधिकाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्लेखोरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल आहे.
भूपेश बघेल यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली. त्यानंतर ईडीचे अधिकारी संध्याकाळी निघाले असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक आणि विटांचा मारा करण्यता आला. ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांवरही दगडांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले की नाही याची माहिती मिळू शकली नाही. भूपेश बघेल आणि त्यांचे चिरंजीव चैतन्य बघेल यांच्यावर कथित मद्य घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्या विविध ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यावेळी ईडीला मोठी रक्कम सापडल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात भूपेश बघेल समर्थक ईडी अधिकाऱ्यांची कार रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी दोन्ही बाजूने कारवर दगडांचा मारा होताना दिसत आहे. पण या हल्ल्यात वाहनाचं काहीही नुकसान झालेलं नाही. या हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथून निघणं अधिक सोयीस्कर समजलं.
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे संसदेतील मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्याच हेतूने बघेल यांच्या घरी ईडीच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
कथित घोटाळ्याप्रकरणी मुलगा अडचणीत
यापूर्वीही ईडीने कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी भूपेश बघेल यांच्या मुलाच्या विरोधात धनशोधन चौकशीच्या अंतर्गत छापेमारी केली होती. भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य याने भिलाई (दुर्ग जिल्हा) येथे चैतन्यचे कथित सहकारी लक्ष्मी नारायण बंसल ऊर्फ पप्पू बंसल आणि इतरांच्या ठिकाणी पीएमएलए कायद्यांतर्गत तपास केला जात होता