Indian students : भारतीय विद्यार्थ्यांना चीन पुन्हा व्हिसा सुरू करणार, कोरोनानंतर दोन वर्षांनी घेतला निर्णय

चीनमध्ये भारतातील सुमारे 20 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. कोविड काळात हे विद्यार्थी भारतात परतले होते. आता परत चीनमध्ये जाऊन ते आपला उर्वरित अभ्यास पूर्ण करू शकणार आहेत.

Indian students : भारतीय विद्यार्थ्यांना चीन पुन्हा व्हिसा सुरू करणार, कोरोनानंतर दोन वर्षांनी घेतला निर्णय
भारतीय विद्यार्थ्यांना चीन पुन्हा व्हिसा सुरू करणार
| Updated on: Aug 22, 2022 | 10:43 PM

चीनमध्ये भारतातील 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु, कोरोना काळात हे विद्यार्थी भारतात परत आले होते. या विद्यार्थ्यांना कोविड व्हिसा निर्बंधांचा (Covid visa restrictions) सामना करावा लागला होता. आता पुन्हा व्हिसा मिळणार असल्यानं त्यांचं चीनमध्ये होणार शिक्षण पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीटीआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय. भारतीय विद्यार्थ्यांना (Indian students) चीनमध्ये परतून त्यांचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे. भारतातील चीनचे राजदूत सन वेईडोंग नुकतेच म्हणाले होते की, भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी पुन्हा अभ्यास सुरू करेल. भारत आणि चीनचे (India and China) संबंधित विभाग या दिशेने प्रयत्न करीत होते. तब्बल दोन वर्षांच्या ब्रेकनंतर चीन सरकार भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करेल. कोविडच्या सुरुवातीपासूनच भारतीय विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत गेले नव्हते. ही परत जाण्याची संधी आता या विद्यार्थ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

20 हजार विद्यार्थी चीनमध्ये शिकतात

मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये भारतातील सुमारे 20 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. कोविड काळात हे विद्यार्थी भारतात परतले होते. आता परत चीनमध्ये जाऊन ते आपला उर्वरित अभ्यास पूर्ण करू शकणार आहेत. या विद्यार्थ्यांना कोविड निर्बंधांचा सामना करावा लागला होता. भारतातून वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा धोरण लागू करण्यात आलंय.

भारतीय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा

कोविड काळात चीननं पर्यटन तसेच अन्य व्हिसा अनिश्चित काळासाठी बंद केला होता. विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे व्हिसासंदर्भात बोलणं सुरू होतं. काही विद्यार्थ्यांना परतीसाठी मान्यता मिळाली होती. आता ही संख्या वाढणार आहे. भारतीय दुतावास आणि विदेश मंत्रालय चिनी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत होते. त्याला यश मिळालं आहे. आता विद्यार्थ्यांना चीनमध्ये शिकण्यासाठी व्हिसा मिळणार आहे.