चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश

मोठी बातमी समोर येत आहे. चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. भारत हा आमचा प्रतिस्पर्धी देश नाहीये, तर आमचा नैसर्गिक भागिदार देश आहे, असं चीनने म्हटलं आहे.

चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश
xi jinping
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 6:10 PM

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आल्यानंतर भारताची चीन आणि रशियासोबतची जवळीक चांगलीच वाढल्याचं पहायला मिळालं होतं. चीनकडून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा निषेध देखील करण्यात आला होता. जर अमेरिका भारतावर टॅरिफ लावत असेल तर भारतीय वस्तूंना आपल्या बाजारपेठा खुल्या आहेत, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. चीन, भारत रशिया या त्रिपक्षीय संबंधांवर बोलताना चीनने भारताचं कौतुक केलं आहे. भारत हा आमचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश असल्याचं चीनने म्हटलं आहे. आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीयेत, तर एक नैसर्गिक व्यापारी भागीदार देश आहोत, असं चीनने म्हटलं आहे.

त्यामुळे एकमेकांबाबत चांगले संबंध निर्माण करणे, त्यांची जोपासना करणे हे आमच्या तीन्ही देशांच्या हिताचं असल्याचं चीनने म्हटलं आहे. तसेच हे जगात शांती, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी देखील आवश्यक असल्याचं चीनने म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लिन जियान यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले लिन जियान?

चीन, रशिया आणि भारत या तीन्ही सध्या जगात सर्वाधिक झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्था आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत चांगले संबंध ठेवणे जगासाठी खूप फायद्याचं आहे. भविष्यात व्यापारी आणि संरक्षण विषयक संबंध आणखी मजबूत व्हावेत यासाठी चर्चा सुरूच राहील असं चीनने म्हटलं आहे. दरम्यान सध्या भारत आणि चीन सीमेवर देखील कोणतीही तणावपूर्ण स्थिती नसून, स्थिर परिस्थिती आहे. त्यामुळे आता अशीच स्थिती सीमावर्ती भागात ठेवण्याची गरज आहे. चीन आणि भारताला एकमेकांचे शत्रू नाही तर मित्र होण्याची गरज आहे. व्यापारी संबंध अधिक मजबूत झाले पाहिजेत असंही यावेळी लिन जियान यांनी म्हटलं आहे. चीनने भारतासोबतच रशियाचं देखील कौतुक केलं आहे. तीन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारले पाहिजेत, यावर चीनने जोर दिला आहे.

 

Follow Us