CJI Surya Kant यांनी राहुल गांधी आणि खरगे यांना भेटण्यास का दिला नकार, तीन कारणे…

सुप्रीम कोर्टाचे सीजेआय सूर्यकांत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे आणि अन्य शिष्ठमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. विरोधी नेत्यांनी कथित निवडणूक अनियमितता, एसआयआर प्रक्रिया आणि निदर्शकांविरोधात पोलिस कारवाई संदर्भात सर न्यायाधीशांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता.

CJI Surya Kant यांनी राहुल गांधी आणि खरगे यांना भेटण्यास का दिला नकार, तीन कारणे...
Chief Justice of India Surya Kant
| Updated on: Oct 12, 2026 | 4:18 PM

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना भेटण्यास भारताचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी नकार दिला आहे. यावरुन आता राजकारण सुरु आहे.भाजपाने आरोप केला आहे की राहुल गांधी संविधानात्मक बाबींचे उल्लंघन करत आहेत. तर सर न्यायाधीश सुर्य कांत यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी भेटण्यास नकार देण्याची काय नेमकी कारणे हे पाहूयात…

सीजेआय सुर्य कांत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्या शिष्ठमंडळाला भेट नाकारली आहे. या मार्ग हे प्रकरण आधीचे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे हे एक कारण त्यांनी दिले आहे. काँग्रेसने सोमवारी प्रसारमाध्यमांकडे शेअर केलेल्या पत्रानुसार सरन्यायाधीशांनी यात दुसरे कारण अशा प्रकारची चर्चा करणे ही न्यायिक नैतिकता आणि औचित्यानुसार नसल्याचे म्हटले आहे.

Loading...

राहुल गांधी यांची मागणी

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की देशाचे तरुण, विरोधी पक्ष दल, सिव्हील सोसायटी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे, भारताच्या संविधानासोबत उभे राहणारे सर्व लोक सोबत चलूयात, आपण देशाच्या मुख्य न्यायाधीशांना एक मेमोरेंडम सोपवूयात, मत चोरी बंद व्हावी, एसआयआरवर बंदी घालाली आणि निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केल्या आहेत. राहुल गांधी यांनी काल एक पोस्ट टाकत नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल आणि मोहन भागवत आमचा आवाज दाबू शकत नाही. हे कायर आहेत ते आम्हाला घाबरवू शकत नाहीत. यांना मागे हटावेच लागेल. आपण एकत्र, प्रेम, सदभावना आणि देशभक्तीसह जाऊयात. तुम्ही घाबरु नका, संपूर्ण भारत आपल्या सोबत या मार्चमध्ये सहभागी असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us